पुणे

अट्टल वाहनचोरट्याला अटक करून २४ दुचाक्या केल्या जप्त हडपसर पोलिसांची कामगिरी

पुणे ः शहरातून अट्टल वाहनचोरट्याला अटक करून १२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २४ दुचाकी जप्त केल्या. दीपक ऊर्फ जोजो बाबुराव सरवदे (वय ३०, रा. थोरातवस्ती, द्वारका मेडिकलसमोर, कोलवडी रोड, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांना आरोपीची सूत्रांकडून माहिती मिळाली, त्यानुसार आरोपी दीपक ऊर्फ जोजो बाबुराव सरवदे याला ताब्यात घेऊन तपास केला असता २४ गुन्हे उघडकीस आले. आरोपीने मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. सरवदेवर हडपसर-१९, मुंढवा-२, लोणीकंद-२, लोणी काळभोर-१ असे २४ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.

पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, दीपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, सुशील लोणकर, संदीप राठोड, ज्योतिबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, नीलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, तुकाराम झंजार, अभिजित राऊत यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.