पुणे ः समाजाच्या जडणघडणीमध्ये सर्वस्तरातील नागरिकांचा मोठा वाटा आहे. आई-वडिल आणि गुरुजनांचे कार्य अनमोल आहे. दहावी-बारावीसह स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्यांचे योगदान मोठे आहे. समाजाला चांगली दिशा देण्याचे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी व्यक्त केले.
लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने,तुकाई दर्शन येथे ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांनी बांधकाम क्षेत्राला प्रसिद्धी माध्यमाचे योगदान या विषयावर जम्मू-काश्मिरमधील विश्व मानवाधिकार संस्थेने विद्या वाचस्पती पदवी (पीएच.डी.) मिळविली. त्याबद्दल होले यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक शादाब मुलाणी प्र. एस. टी.पवार, राजू सावळगी, पांडुरंग शेंडे, विजय बढे, अंकुश थोपटे, राजाराम गायकवाड, माच्छिंद्र पिसे, मोरेश्वर कुलकर्णी, समीर मुलाणी, हनुमंत चव्हाण,आनंद पाचागंणे,ओम घाडगे आदींसह बहुसंख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. अशोक बालगुडे म्हणाले की, लोककल्याण प्रतिष्ठान लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. दाहवी-बारावीतील गुणवंतांचा सन्मान, तसेच विधवा आणि निराधारांना दर महा रेशन, गरजू मुला-मुलींना सायकल देत त्यांची गैरसोय दूर करण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांनी फक्त क्रमिक पुस्तकावर थांबून चालणार नाही, अवांतर वाचन, नियमित अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. एस.टी. पवार यांनी सूत्रसंचालन केले.