हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिक्षक पुरस्कार वितरण महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्कृष्ट संसदपटू आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर वैशाली बनकर, महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, प्रशांत वाघमारे, उपस्थित होते.
पुरस्कारार्थी मिनाक्षी संजय पवार, अनिल महादेव जगताप, वर्षा संदिप काळे, रावसाहेब मुरहरी पाटील, संतोष धोंडिबा दुर्गाडे, अश्विनी मनोज शिंदे यांचा समावेश होता.
मतदारसंघात असे पुरस्कार वेगवेगळे शाळांत दिले जाणार आहेत.
कार्यक्रमांचे आयोजन अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, कार्याध्यक्ष संदिप बधे, शिक्षक सेल अध्यक्ष लालासाहेब खलाटे यांनी केले.