पुणे

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत हडपसरच्या आमदारांचे नाव गायब, “अजित पवार उमेदवार बदलणार की शिंदे शिवसेनेच्या शिलेदारास संधी मिळणार?

हडपसर /पुणे (प्रतिनिधी)
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्येच निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे, पक्षाची पाहिली 25 जणांची यादी प्रसिद्धीमाध्यमात प्रसिद्ध झाली त्यात हडपसरच्या विद्यमान आमदाराचे नाव नसल्याने हडपसर मधून उमेदवार बदलणार? याची चर्चा राजकीय पटलावर सुरु झाली आहे.

गणेशोत्सव धामधूम संपली की विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे महायुतीमधील सर्वच घटक पक्ष जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती मधूनच निवडणूक लढविणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे लवकरच महायुतीच्या शंभर उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे यामध्ये भाजप 50 शिवसेना शिंदे गट 25 व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 संभाव्य उमेदवारांची यादी नुकतेच सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली नेत्यांनी ही यादी अंतिम नसल्याचे सांगितले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस मधून विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यमान आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे, अतुल बेनके यांची नावे या यादीत असताना हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचे नाव मात्र या यादीत नसल्याने हडपसर बाबत संभ्रम निर्माण झाला आहे, पाच वर्षातील अधिक काळ सत्तेत असतानाही मतदारसंघात चांगले प्रकल्प आणण्यात व विकास कामे राबविण्यात हडपसरच्या आमदारांना अपयश आल्याने या मतदारसंघातील उमेदवार बदलला जाण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हडपसर साठी माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक आनंद आलकुंटे, नंदा लोणकर यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

“मुख्यमंत्र्यांची पुण्यातील शिलेदारासाठी महायुतीत फिल्डिंग…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार असलेले शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यासाठी पुण्यात एक जागा विधानसभेला मिळाली म्हणून मुख्यमंत्री आग्रही आहेत, हडपसरच्या विद्यमान आमदारांनी विषयी असलेली नाराजी पाहता अजित पवार हा मतदारसंघ सोडून दुसरा एखादा चांगला मतदारसंघ घेतील असा अंदाज वर्तविला जात आहे यामध्ये शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे यांना हडपसर मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हडपसर विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार का? अजित पवार दुसरा उमेदवार देणार? की हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.