मोरगाव, पुणे अष्टविनायकांपैकी श्री मयुरेश्वर, मोरगाव, जि. पुणें यांचे दर्शन डॅा.निलम गोर्हे, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेता यांनी घेतले. यावेळी अथर्वशीर्ष व गणपतींची आरती म्हणुन संकल्पसिद्धीसाठी श्रीफलांचे तोरण अर्पण करण्यात आले. तसेच देवस्थानास २१००० रुपयाचा चेक सुपुर्द करण्यात आले. यावेळी संस्थांच्या वतीने महावस्त्र व मयुरेश्वर यांची प्रतिमा देऊन डॉ.गोर्हे यांचा सत्कार केला.
यावेळी मा.ना.नरेंद्र मोदीजी तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले व एनडीएचे सरकार निवडुन आले त्याबद्दल आभार मानले. यावेळी अष्टविनायकाच्या प्रत्येक देवस्थानांच्या विकासाच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा त्यांनी विचार व्यक्त केला.
यावेळी नीलमताईंची बहिण जेहलम जोशी व ऊपसभापती कार्यालयाचे अधिकारी अरविंद माळी, योगेश जाधव, प्रतिभा राऊत, सामाजिक कार्यकर्ते युवराज सुर्यवंशी, शिवसेना पुणें पदाधिकारी युवराज शिंगाडे , राजु तम्मा विटकर ऊपस्थित होते .