पुणेहडपसर

पुण्यातील शिवसैनिक थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी मुंबईकडे पायी रवाना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आक्रमक

हडपसर मधून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी याकरिता पुणे शहरातील शिवसेना आक्रमक झाली असून, हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी हडपसर पासून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पायी चालत जात जावून शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांना हडपसर मतदार संघ शिवसेनेसाठी सोडावा यासाठी विनंती करणार आहेत, पुण्यात शिवसेनेचा एक तरी आमदार शिवसेनेचा असावा ही तमाम शिवसैनिकांची मागणी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर धरत आहे.
पुणे शहरात शिवसेनेच्या वाटेला आठ मतदारसंघांपैकी हडपसर हा मतदारसंघ यावा यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असून थेट वर्षा निवासस्थानी चालत जाऊन उमेदवारी मागणार असल्याचे प्रवक्ते अभिजीत बोराटे व महिलांनी सांगितले.

शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे हे आमदार असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दुसर्‍या बाजूला याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे हे देखील इच्छुक आहेत. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच महायुतीमधील नेत्यासमोर निर्माण झाला आहे. त्याच दरम्यान काल सायंकाळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी दिली जावी, या मागणीसाठी हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली. या माध्यमांतून नाना भानगिरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले. आता त्यानंतर हडपसर मतदारसंघातील शिवसैनिक अधिक आक्रमक झाले असून हडपसर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पायी चालत निघाले आहे.