हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघात राजकारणाची गर्मी वाढू लागली आहे. मात्र मतदारसंघातील दिग्गज राजकीय नेता असलेले महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार बधे यांच्या रूपाने सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला आहे. सोमवारी कोंढवा खुर्द परिसरामध्ये आयोजित केलेल्या पद यात्रेत जागोजागी स्थानिक नागरिकांनी उमेदवार गंगाधर बधे
यांना आशीर्वाद रुपी पाठिंबा दिला आहे. पदयात्रदरम्यान गंगाधर बधे यांनी सांगितले, मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणुका लढवत आहे. इतर राजकीय लोकांसारखे खोटे आश्वासन मी देणार नाही, मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा कोंढवा बुद्रुक गावठाणातील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या सोबत ग्रामदैवत दर्शन घेऊन पदयात्रा ला सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा कोंढवा बुद्रुक गावठाण, लक्ष्मी नगर, काकडे वस्ती, सर्वे नंबर पाच, आश्रफनगर, संत ज्ञानेश्वर नगर, कान्हा चौक,टिळेकर नगर, पाण्याची टाकी, परत कान्हा चौक, गोकुळनगर, साईनगर या ठिकाणी समारोप करण्यात आला. यावेळी माऊली कामठे, मधुकर धांडेकर, संदीपदादा दांडेकर, सचिन दादा निंबाळकर, मधुकर नाना मरळ, रामदास कामठे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रा दरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिकांनी गंगाधर बधे यांना विजयाचा आशीर्वाद दिला. अनेक महिलांनी जागोजागी त्यांचे औक्षण करण्यात आले. अनेक नागरिकांनी घरामध्ये बोलावून त्यांना कोंढवा परिसरातील समस्या सोडवण्याची विनंती केली. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात असलेला जनसमुदाय पाहून जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
पदयात्रा दरम्यान मतदार बाबुशेठ अडसूळ यांनी सांगितले, गंगाधर अण्णा बधे हे मागील वीस वर्षापासून कोंढवा परिसरामध्ये सामाजिक काम करतात. अनेक गरीब व कष्टकरी लोकांना त्यांनी मदत केली आहे. मुस्लिम असो किंवा हिंदू असो किंवा आणि कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो सर्वांना आपला माणूस म्हणून त्यांनी मदत केली आहे. सच्चा जनसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे गंगाधर बधे यांनाच माझे मत असेल, तुम्ही पण गंगाधर बधे यांचे चिन्हा असलेले एअर कंडिशनर समोरील बटन दाबून बहुमताने निवडून द्या.