हडपसर ( प्रतिनिधी ) :- हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या पदयात्रा व रोडशोला मतदारांचा वाढता प्रतिसाद. रॅलीमध्ये हजारो नागरिक व महिलांचा सहभाग झाल्याने निवडणुकीचे समीकरण बदलणार,मुख्य तीन उमेदवारांना डावलून अपक्ष उमेदवार गंगाधर बधे निवडून येण्याची चर्चा रंगली. दरम्यान रॅलीमध्ये उमेदवार गंगाधर बधे व माजी आमदार महादेव बाबर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत गंगाधर बधे यांना बहुमताने निवडून द्या असे बाबर यांनी आव्हान केले.
रामटेकडी येथील साईबाबा मंदिर या ठिकाणाहून अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची रॅली सुरू झाली. रॅलीमध्ये हजारो महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग झाल्याने महिलांची मोठी रांग लागल्याने मतदार संघातील सर्वात मोठी रॅली असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान ही रॅली रामनगर अंधशाळा, पुढे अण्णाभाऊ साठे उद्यानापासून भुयारी मार्गाद्वारे गोसावी वस्ती, म्हाडा कॉलनी, वैदुवाडी यानंतर पुढे शंकर मठ वस्ती मधून रॅली मगरपट्टा चौकातून हडपसर मध्ये आली. रॅली मधील वाढता प्रतिसाद पाहता अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप तयार केली. पुढे भोसले गार्डन मार्गे हडपसर गावठाण मध्ये आली भाजी मंडई परिसरामधून पुढे रॅली ससाणे नगरला मार्गामध्ये गेल्यानंतर मोठा जल्लोष झाला. या ठिकाणीच रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये हडपसर मतदार संघाचे दिग्गज ज्येष्ठ नेते महादेव बाबर , अपक्ष उमेदवार गंगाधर बधे, रामटेकडी प्रभाग प्रमुख यशवंत मंडलिक, सुरज चव्हाण,प्रेम कसबे, बालाजी उदारे, तुषार झोंबाडे,रवी तुजारे, तोसिफ पटेल, हर्षल मंडलिक, मीना शिंदे, लिंबाजी फडके, शिवाजी भोसले, यश चव्हाण, तुषार बल्लाळ, संतोष शिंदे, सुशील मोरे, मयूर शिंदे, गणेश पवार, रोहन लाकडे गणेशं शिंदे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी माजी आमदार महादेव बाबर यांनी सांगितले, मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी राजकारण न करता सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. गोरगरीब गरजू लोकांना खूप मोठी मदत ते नेहमी करत आलेत. निष्ठावंत आणि सच्चा कार्यकर्त्यांच्या मागे मी उभा आहे, हडपसरची जनता ही आपला हक्काचा माणूस अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना निवडून देण्याचे मी आव्हान करत आहे.
विभाग प्रमुख यशवंत मंडलिक व प्रेम कसबे यांनी सांगितले की, अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या सोबत आम्ही आहोत. गंगाधर बधे यांचे काम सांगितल्यानंतर रामटेकडीतल्या बहुसंख्य नागरिकांनी त्यांना पाठिंबा देत रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची एवढी मोठी रॅली झाली नाही. त्यामुळे यावेळेस गंगाधर बधे यांनाच निवडून देण्याचा आम्ही कष्टकरी नागरिकांनी निर्धार केला आहे.