२१३ हडपसर विधानसभा मतदारसंघ मा.निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी मतदारांना आवाहन केलेले आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना प्रसिद्धीस दिल्या आहेत.
मतदारांना मतदान केंद्राच्या परिसरात तसेच मतदान कक्षामध्ये मोबाईल सोबत बाळगण्यास प्रतिबंध राहील. मोबाईल मधील डिजिटल ओळखपत्र मतदानाकरिता
स्वीकारले जाणार नाही
मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतदानाला जाताना, मतदान ओळखपत्र (Epic Card) व ते उपलब्ध नसल्यास खालील १२ पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक
ओळखपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
मा.भारत निवडणूक आयोग यांनी मतदाराची ओळख पटवण्यासाठी दि.१९ मार्च २०२४ च्या आदेशानुसार खालील १२ पर्यायी पुराव्यांची यादी निश्चित करुन दिली आहे.
१. आधार कार्ड.
२. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, मजूर नोंदणी कार्ड.
३. बँक / पोस्ट ऑफिस / पास बुक.
४. शासकीय / निमशासकीय कर्मचारी /कंपनी कामगार इ.चे ओळखपत्र.
५. ड्रायव्हींग लायसन्स.
६. आयकर ओळखपत्र (PAN CARD)
७. आयुक्त राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (NPR) अंतर्गत भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि
जनगणना यांनी निर्गमीत केलेले स्मार्ट कार्ड.
८. पासपोर्ट (पारपत्र)
९. निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पेन्शनची कागदपत्रे.
१०. केंद्रशासन / राज्यशासन/ सार्वजनिक सेवा उपक्रम/ मर्यादित सार्वजनिक कंपन्या यांनी
त्यांच्या कर्मचाऱ्यांना निर्गमित केलेले फोटोसह असलेले ओळखपत्र.
११. खासदार/विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र.
१२. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण , भारत सरकार यांनी निर्गमीत केलेले UNIQUE DISABILITY IDENTITY CARD ( UDID CARD )
टीप :- फक्त फोटो व्होटर स्लिप (Voter Slip) च्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही. मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. २८/०२/२०१९ च्या सूचनेनुसार फोटो व्होटर स्लिप (Voter Slip) घेऊन येणाऱ्या मतदारास उपरोक्त पैकी एक ओळखीच्या पुराव्याच्या मूळ प्रत सादर करणे अनिवार्य आहे.