महाराष्ट्र

अकलूज येथिल खून खटल्यातील आरोपी नागेश ऊर्फ बाबर जगन्नाथ मदाडे याची निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

अकलूज येथील माने पाटील यांच्या वीटभट्टी येथे घडलेल्या उमेश शाहू गाडे यांच्या खुन प्रकरणी दिनांक १४ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी बापु शाहू गाडे यांनी भा. द. वि. कलम ३०२ व ॲट्रॉसिटी कायदा कलमा अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदरील गुन्ह्याचा तपास डि.वाय.एस.पी. श्री. नीरज राजगुरु यांनी करत आरोपी नागेश ऊर्फ बाबर जगन्नाथ मदाडे यास अटक केली. सदरील गुन्ह्यात आरोपी हा कारागृहात होता.यात हकीकत अशी की , दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११.३० वाजता आरोपी नागेश ऊर्फ बाबर जगन्नाथ मदाडे हा हमीद यांना उमेश शाहू गाडे यांच्या घराजवळ मोठ्याने हाक मारू लागले त्यावेळी उमेश शाहू गाडे यांची बहीण लक्ष्मी बापु ओव्हाळ यांनी आरोपी यांना मोठ्याने का ओरडत आहात असे विचारले असता आरोपी याने त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर दिनांक १४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता मयत उमेश शाहू गाडे यांनी आरोपी यास ” माझ्या बहिणीला का मारले? ” असा जाब विचारला . त्यावेळी आरोपी यांच्या पत्नीने त्यांना चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली . त्यावेळी फिर्यादी यांनी मयत यांना वाचवले. त्यावेळी आरोपी याने मयत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच दिवशी ६ च्या सुमारास फिर्यादी यांना त्यांचे भाऊ मयत उमेश शाहू गाडे यांचा खून झाल्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी यास उमेश गाडे याच्या खून खटल्यात अटक करण्यात आली. दरम्यान आरोपी याच्या विरुद्ध न्यायालयाने खटला चालू करून प्रत्यक्षदर्शी 5 साक्षीदार तपासले. सदरील आरोपी तर्फे .ॲड श्री. बी.आर. भिलारे यांनी काम पाहिले त्यांना ॲड विक्रम भिलारे ,ॲड अमोल वाळेकर ॲड राहुल जगदाळे,ॲड आदेश चव्हाण ॲड धनंजय काळभोर यांनी मदत केली. सदरील खून खटल्यात आरोपीचे वकील ॲड. बी.आर. भिलारे यांनी घेतलेला उलटतपास हा प्रभावी ठरला. सदरील आरोपी याची सबळ पुराव्याअभावी खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.