केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक वक्तव्या विरोधात संपुर्ण देशात संसद, विधानसभा, विधानपरिषद, असो किंवा रस्त्यावर नागरीकांनी निर्भीडपणे भाजप सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे.
शिवसेना पुणे शहराच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको करून निषेध करण्यात आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर का अवमान नही सहेगा हिंदुस्तान”, बोला जय भिम”, ” मी आंबेडकर.. तू आंबेडकर … अशा घोषणेने पुण्यात दांडेकर पूल परिसरात शिवसेना [उद्धव बाळासाहेब ठाकरे] पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी शिवसैनिकांसोबत स्थानिक नागरिकांनीही, महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला , आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले, आणि अमित शाह ह्यांनी गृहमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले कि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला बुध्दीचातुर्याने राज्यघटना दिल्यामुळेच आपण देशाचे गृहमंत्री म्हणून संसदेत आहेत. आणि तिथे बसूनच आपण पूजनीय असलेल्या विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करता, भाजपच्या पोटातले आपण ओठावर आणले. देवाची पूजा आम्ही सर्व बांधव आवर्जून करतो. त्यासोबतच ज्यांनी आम्हाला स्वर्गाहून चांगल स्वराज्य दिल. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतो. देशाला ज्यांनी राज्यघटना दिली. संविधान लिहून कायदा तयार केला. सर्वाना समान जगण्याचा हक्क, अधिकार दिला. तडीपार गुन्हेगार असूनही त्यांना निवडणूक लढवण्याचा हक्क दिला. सभागृहात मानसन्मान मिळवून दिला. ज्या महामानवाने न्याय मिळण्यासाठी न्यायालय दिले. पृथ्वीवरच स्वर्गसुख दिले. त्या परमपूज्य, विश्वरत्न, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचीदेखील आम्ही पूजा करतो. तुमच्या देवाची आठवण सांगतो. पुण्यात औंध भागात ज्यावेळी आधुनिक देवाच मंदिर उभ करून आधुनिक देवाची पूजा सुरू झाली. त्यावेळी आपण गप्प होतात. तेव्हा 7 जन्माच्या स्वर्गसुखाची आठवण नाही झाली. महागाईच्या देवाची शिवसेनेने पूजा केली आणि आधुनिक देव मंदिरासहित गायब झाला. हे आपण हेतुपुरस्सर विसरलात. ज्यांनी जगण्याच सामर्थ्य दिलं त्यांचीच अवहेलना करता. यासर्व वक्तव्याचा, विचारांचा आणि तुमचा जाहिर निषेध करीत आहे. यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रदेश संघटक वसंत मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत , उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, शहर संघटक राजेन्द्र शिंदें, किशोर रजपूत, बाळासाहेब भांडे, उमेश गलिंदे, निलेश जठार, विभागप्रमुख सुरज लोखंडे, प्रसाद काकडे, गोविंद निंबाळकर, प्रसाद चावरे, संदीप गायकवाड, अजय परदेशी, अनिल माझीरे, मनीष जगदाळे, नंदू येवले, राजू चव्हाण, दिलीप पोमण, मारुती ननावरे, मकरंद पेठकर, अजित बांदल, युवासेनेचे शहर अधिकारी राम थरकुडे, परेश खांडके, गौरव पापळ, विलास नावडकर, ज्ञानंद कोंढरे, विजय जोरी, संजय साळवी , आरोग्य सेनेचे रमेश क्षिरसागर, नितीन निगडे, स्वप्नील जोगदंड, नीतीन रावलेकर, अरविंद दाभोलकर, निखिल जाधव, तानाजी लोहकरे, प्रतीक गलिंदे, नितीन दलभजन, बाळासाहेब गरूड, अप्पा आखाडे, शिवाजी पासलकर, राहुल शेडगे, रमेश लंडकत, गणेश घोलप, सुनील गायकवाड, नंदू जांभळे, देवेंद्र शेळके, शरद गुप्ते, सचिन मोहिते, मिलिंद माने,अमोल रणपिसे, गणेश वायाळ, सागर देठे, सतीश गवळी, शहादू ओव्हाळ, आकाश बालवडकर, महिला आघाडीच्या वतीने वैशाली कापसे, शीतल जाधव, कमल रोकडे, मथुरा बाई गवळी, तसेच स्थानिक नागरिक , आंबेडकर प्रेमींनी उस्फुर्त आंदोलनात सहभाग नोंदविला .