प्रतिनिधी -स्वप्नील कदम
कुंजीरवाडी ग्रामपंचायतच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक २५/१२/२०२४रोजी सकाळी ठीक दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत बुधराणी हॉस्पिटल पुणे व ग्रामपंचायत कुंजीरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व डोळे तपासणी शिबिर तसेच मोफत भिंगरोपण शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे व वर्धापन दिनाचे उदघाटन कुंजीरवाडी गावचे विद्यमान सरपंच हरेश शामराव गोठे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. मानवाच्या शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव असून त्याची व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे, या हेतूने हे शिबीर आयोजित केले गेले होते. या शिबिरात गावातील ग्रामस्थांनी जेष्ठ नागरिक व महिला भगिनींनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. चारशे ते पाचशे लोकांची तपासणी करण्यात आली. यातील अनेक नागरिकांची शस्त्रक्रिया होणार आहेत तसेच ग्रामपंचायतच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये मोफत लेन्स बसवून दिले जाणार आहे. प्रथमच ग्रामपंचायतच्या वतीने वर्धापनदिनाच्या निमित्ताने आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात आला, त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे कौतुक केले व असेच आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात यावे असे सांगण्यात आले.
यावेळी विद्यमान सरपंच हरेश गोठे, मा. सरपंच सचिन तुपे, तंटामुक्ती अध्यक्ष बाप्पू घुले, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, मा. उपसरपंच भरत निगडे, डाळिंब उत्पादन संघ महाराष्ट्र राज्य सचिव गोरख घुले, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, सागर निगडे, चंद्रकांत मेमाणे, कैलास तुपे, अजय कुंजीर, लता कुदळे, सारिका भोंगळे, अलका कुंजीर, गोकुळ ताम्हाणे, उपसरपंच दिपक ताम्हाणे, ग्रामपंचायत अधिकारी सविता भुजबळ, काळूराम कुंजीर, गजानन जगताप, आदेश जाधव, दिलीप सावंत, विशाल वाईकर, नवनाथ आंबेकर, नाथाशेठ कुंजीर, दादा वाईकर, शाम यादव, प्रफुल्ल कुंजीर, राजेंद्र पेटकर, दत्तात्रय जाधव तसेच आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.