परभणीपालघरपिंपरी-चिंचवडपुणेपुणे शहरबारामतीबीडबुलडाणाभंडाराभोरमावळ

पुस्तक संस्कृतीच समाज समृद्ध करते : प्रा. डॉ. पुरूषोत्तम काळे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२४” या उपक्रमांतर्गत कार्यशाळा

समाजातील वाचक अजून जागा झाला नाही. केवळ मनोरंजनासाठी वाचू नका वाचनाने विचारवंत, चांगले नागरिक, पुढची पिढी घडत आणि समाज असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पुस्तके वाचा. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हा पुस्तकाचा गाभा असतो. पुस्तक हे परिपूर्ण असते. वाचनाने व्यक्तीचा दृष्टिकोन व तर्कशुद्ध विचार मांडण्याची क्षमता विकसित होते असे मत प्रकाशक अविनाश काळे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२४ या उपक्रमांतर्गत वाचन कौशल्य आणि पुस्तक परीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रकाशक अविनाश काळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी पुस्तक परीक्षण ही वाचनाच्या पुढील प्रक्रिया असून त्यात पुस्तकातील विचार, जीवनमूल्ये, लेखकाची प्रेरणा यांचे विश्लेषण केले जाते. असे सांगितले.

या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, प्रा. प्रा. विलास शिंदे, डॉ. दत्तात्रय टिळेकर, प्रा. नाना झगडे, डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. आशा माने, डॉ. वंदना सोनवले, अशोक शेकडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल शिंदे यांनी केले तर आभार प्रा. आशा माने यांनी मानले.