राजगुरुनगर मधील दोन निष्पाप मुलींवर झालेल्या अत्याचारातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच शासनाने कुटुंबाला मदत करावी या मागणीसाठी हडपसर व पंचक्रोशीतील गोसावी समाजाच्या वतीने रॅली काढून निवेदन देणार आहेत.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा सावंत म्हणाल्या, राजगुरू नगर मध्ये एका राक्षसी वृत्तीच्या माणसाने दोन चिमुकल्या जीवांवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून केला, अत्याचार केलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी व पीडित कुटुंबाला शासनाने तातडीने मदत करावी या मागणीसाठी रवी दर्शन ते हडपसर पोलीस स्टेशन मोक रॅली काढण्यात येणार आहे, हडपसर पोलीस स्टेशन मध्ये रॅलीची सांगता झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांना निवेदन देऊन आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
शुक्रवारी तीन तारखेला सायंकाळी पाच वाजता रॅली ची सुरुवात रवी दर्शन चौकातून होईल या रॅलीत गोसावी समाज व परिसरातील नागरिक सहभागी होणार आहेत या संदर्भात हडपसर पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे, चिमुकल्या कोवळ्या जीवांना न्याय देण्यासाठी हडपसर पंचक्रोशीतील समाजातील महिला व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सीमा सावंत, बाजीराव धांदे, चेतन चव्हाण, दिनेश सावंत, आकाश आटोळे, भाऊसाहेब आटोळे, सुनील चव्हाण यांनी केले आहे.