प्रतिनिधी/पुणे
महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची माऊली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिक तसेच महिला आघाडीच्या वतीने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची जयंती म्हणजे त्यांचं निस्वार्थ सेवा, त्याग, आणि मातृत्व यांचा सन्मान करण्याचा दिवस. समाजसेवा आणि कुटुंबप्रेम यांच्या अद्वितीय समन्वयाने त्यांनी सर्वांसमोर आदर्श ठेवला. त्यांच्या प्रेरणादायी कार्याने हजारो लोकांना सकारात्मकता आणि उर्जेची दिशा दिली आहे.
मीनाताई ठाकरे या केवळ शिवसेनेच्या स्तंभ होत्या असे नव्हे, तर त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या प्रेरणास्थान होत्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रत्येक क्षणी साथ देत, त्यांनी संघटनेच्या उभारणीत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, हीच विचारधारा कायम जोपासत शिवसेना संघटन वाढीसाठी कार्यरत राहणार आणि त्यांचा विचार घरोघरी पोहचवणार असल्याची भावना यावेळी व्यक्त केल्या. त्याचबरोबर त्यांच्या स्मृतींना वंदन करून, त्यांच्या विचारधारेचे अनुकरण आणि समाजासाठी निरंतर योगदान देण्याचा शिवसैनिकांनी संकल्प केला.
याप्रसंगी महिला आघाडी शहरप्रमुख सुरेखाताई पाटील, उपशहर प्रमुख सूनिताताई उकिर्डे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत, शिवकामगर सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरुमकर, विभागप्रमुख सत्यभामा भवाळ सुनीता भवाळ, नेहा वाघमारे, रेयल काते आदी उपस्थित होते.