थोर समाजसेवक डॉ. सि. तु. तथा दादा गुजर यांच्या नावाने सामाजिक क्षेत्र व वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव समाज कार्याकरिता महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या सन २०२५ च्या पुरस्कारासाठी मान्यवरांची नांवे संस्थेमार्फत जाहीर करण्यात आली आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कार मा.डॉ. संजय देशमुख, इंद्रायणी हॉस्पिटल अँण्ड कॅन्सर इन्स्टिट्युट, आळंदी देवाची यांना जाहीर करण्यात आलेला आहे. सन २००३ पासून कॅन्सरच्या रुग्णांवर स्वस्त दरात उपचार त्यांच्यामार्फत केले जात आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार मा. डॉ. गिरीष कुलकर्णी, स्नेहालय संस्था, अहमदनगर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. सन १९८९ पासून एचआयव्ही आणि एड्स, तस्करी, लैंगिक हिंसाचार आणि गरीबीने ग्रस्त महिला, मुले आणि एलजीबीटी समुदायांना आधार देण्याचे सामाजिक कार्य करीत आहेत. वर्षाकाठी एक लाखापेक्षा जास्त लाभार्थीना याचा फायदा होतो. हे पुरस्कार डॉ. सि. तु. तथा दादा गुजर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ०१ मार्च, २०२५ रोजी हडपसर, पुणे येथे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव, श्री. अनिल गुजर यांनी दिली.