पुणे (प्रतिनिधी) :: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Pune mahapalika) निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त तरुणांना शिवसेना अधिकची ताकद देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत पुणे शहर शिवसेना सर्वाधिक नवतरुणांना व तरुणींना संधी देणार असल्याचे मत शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केले.
नाना भानगिरे पुढे बोलताना म्हणाले की आगामी महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त तरुणांना संधी दिली जाणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात तरुणांचा आवाज घुमला पाहिजे, अशी भूमिका पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतलेली आहे त्यामुळे तरुणांना जास्त ताकद दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
पुणे महापालिकेच्या निवडणुका पुढच्या काळात होतील मात्र पुणे महापालिकेतून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी पुणे शहर शिवसेना अग्रेसर राहील यावेळी शहरातील आमच्या पक्षाची परिस्थिती निश्चितच वेगळी असणार आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील वर्षांनुवर्ष रखडलेले प्रकल्प शिंदे साहेबांच्या काळात मार्गी लागले याचा अभिमान देखील वाटतो व शहर पातळीवर सर्वाधिक नोंदणी करणारा पक्ष म्हणून देखील शिवसेना येत्या काळात ठरेल अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली त्यामुळे पुणे शहरातून महापालिकेच्या निवडणुकीत तरुणांना अधिकची संधी देणार असल्याचे स्पष्ट मत नाना भानगिरे यांनी व्यक्त केले.