पुणे

दुर्मिळ होत चाललेली लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे – डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्राच्या मातीतील लोक साहित्य हे समुंद्रसारखे अथांग – डॉ. अरुणा ढेरे, लोकसाहित्य व लोकसंस्कृती महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून जपून ठेवली आहे. असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळा व महोत्सवात केले.

महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यशाळा आणि महोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथील संत नामदेव सभागृह येथे संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि  लोकसाहित्य अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव ज्योती भाकरे, फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशनच्या डॉ.सुनीता धर्मराव, शाहीर हेमंत मावळे, प्रवीण भोळे, रमेश वरखडे यांच्या शुभहस्ते हस्ते पार पडले.

 

मोरे म्हणाले की लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला काय आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. ही दुर्मिळ होत चाललेली लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या सर्व लोककलांना राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे त्या काळात या लोककलांची पाळेमुळे घट्ट झाली होती. या लोप पावत चाललेले लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलांना नवसंजीवनी देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून होत आहे, याचा आनंद आहे.

काळकर म्हणाले, की आपल्या या लोककलांना खरा उजाळा देत होते ते म्हणजे शेतकरी, लोक कलावंत हे लोककलेचा शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा वारसा पुढे नेत होते. या लोककलांना, लोकसाहित्याला आमच्या मातीचा वास होता. आमच्या मातीचा स्वाद होता. आमच्या मातीचा नाद होता आणि आमच्या मातीचा आमच्याशी होणारा संवाद होता. तो हरवलेला संवादाला समाजाने साद देणं गरजच आहे.

ढेरे म्हणाल्या, की महाराष्ट्राच्या मातीतील लोक साहित्य हे समुंद्रसारखे अथांग आहे. हे साहित्य निर्माण करणारे साहित्यकारांनी डोंगराएवढं काम करून ठेवले आहे.
याचा वारसा जपन गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन,  भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून घेतलेली ही कार्यशाळा महत्वाची आहे.

 

सदरील महोत्सवाचे संयोजक सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि लोकसाहित्य आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव होत्या. सदरील कार्यक्रमाचे आभार विभीषण चवरे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.सुनीता धर्मराव यांनी केले.