चिपळुण / प्रतिनिधी: [विलास गुरव] कुंभार्ली घाटातील गुरे तस्करीप्रकरणी घेणारे आणि देणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई करा तस्करीचे रॅकेट मुळापासून उखडून टाका अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आमदार शेखर निकम यांनी बुधवारी स्थानिकांसह वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
मंगळवारी रात्री चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात गुरे तस्करीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आमदार शेखर निकम हे आक्रमक झाले. बुधवारी सकाळपासूनच त्यांनी या प्रकरणी जे कुणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीसांकडे चर्चा केली. जिल्हा पोलीस अधिक्षकांशी चर्चा केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हे ही दाखल केले आहेत. मुळातच गुरे तस्करी ही गंभीर बाब असून त्याची पाळे खोलवर रूजलेली आहेत. त्यामुळे ती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे त्यादृष्टीने पोलिसांनी अशा प्रकरणात देणारे आणि ते घेणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई होईतल यादृष्टीने आवश्यक ती पावले उचलावलीत गुरे तस्करीचा पुरता बिमोड करण्याच्यादृष्टीने आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे आमदार निकम यांनी पत्रकाराशी बोलताना सांगीतले.