– चैत्राम पवार, जया प्रदा, स्मिता जयकर, राजेंद्र मुथा, सागर चोरडिया, ऍड. शेखर जगताप, डॉ. राजेश पारसनीस, इंद्रनील चितळे, डॉ. शिवाजीराव डोले, राहुल कपूर जैन, कोब्बी शोषणी, किशोर खाबिया, सुनील वाघमोडे यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’, तर जैनम आणि जीविका जैन यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय यंग अचिव्हर्स पुरस्कार’
पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित करण्यात आले आहेत. परमवीरचक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर, अवकाश शास्त्रज्ञ प्रा. डॉ. नरेंद्र भंडारी, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक सीए डॉ. अशोककुमार पगारिया, नीलकंठ ज्वेलर्सला घरोघरी पोहचविणारे दिलबाग सिंग बीर, वैद्यकीय सामाजिक सेवा प्रदान करणारे डॉ. सदानंद राऊत, उद्योजक मयूर वोरा, मयूर शाह यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी दिली.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “यंदाचा ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ पर्यावरण अभ्यासक पद्मश्री चैत्राम पवार, ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा व स्मिता जयकर, क्रस्ना डाइग्नोस्टिकचे राजेंद्र मुथा, जागतिक व्यापार तज्ज्ञ सागर चोरडिया, इस्त्राईलचे भारतातील कॉऊंसेल जनरल कोब्बी शोषणी, ऍड. शेखर जगताप, सहकार तज्ज्ञ डॉ. शिवाजीराव डोले, वैद्यकीय सामाजिक सेवा प्रदान करणारे डॉ. राजेश पारसनीस, प्रेरक वक्ते राहुल कपूर जैन, उद्योजक इंद्रनील चितळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर खाबिया, कृषी उद्योजक सुनील वाघमोडे यांना, तर ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’ स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी जैनम व जीविका जैन यांना देण्यात येणार आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुढे म्हणाले, “येत्या शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२५) सायंकाळी ५.३० वाजता बंतारा भवन, मुंबई-पुणे महामार्ग, बाणेर, पुणे येथे या पुरस्कारांचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, परमवीरचक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार, ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, विशेष उपस्थिती म्हणून सिस्टर लुसि कुरियन, लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे उपस्थित राहणार आहेत.”