मुंबई

सलून व्यावसायिकांसाठी मुंबईला भव्य सेमिनारचे आयोजन; सलून ब्युटीपार्लर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

मुंबई 🙁 विलास गुरव)सलून ब्युटीपार्लर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मार्फत सलून व्यावसायिकांसाठी भव्य सेमिनार होणार असून हा सेमिनार मुंबईतील “यशवंत नाट्यगृह” इथे संपन्न होणार आहे.
संस्थापक दत्तात्रय चव्हाण यांच्या सलून ब्युटीपार्लर असोसिएशन मार्फत मुंबईतील “यशवंत नाट्यगृह” इथे सोमवार (दि.१०) रोजी भव्य सेमिनार होणार आहे. यामध्ये इंटरनॅशनल हेअर आर्टिस्ट तुषार चव्हाण आणि अथर्व टक्के यांच्या नवनवीन हेअर स्टाईल आणि इंटरनॅशनल ब्युटी एक्सपर्ट लीना खांडेकर यांच्या ब्युटी टिप्स शिकण्याची संधी महाराष्ट्रातील सलून व्यावसायिकांना मिळणार आहे.

या सेमिनारमध्ये सहभागी सलून व्यावसायिकांसाठी लकी ड्रॉ आयोजित केला आहे. त्यामध्ये नामांकित कंपन्यांच्या सलून उपयोगी वस्तू आणि बरच काही असणार आहेत. हा सेमिनार पाहण्यासाठी सलून विश्वातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व सलून व्यावसायिकांनी या सेमिनारला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सलून ब्युटीपार्लर असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण, महाराष्ट्र सचिव मंदार राऊत आणि मुंबई उपाध्यक्ष संदीप बदिरके यांनी केले आहे.