पुणे – प्रतिनिधी – सिकटॅब आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (वामनिकॉम) पुणे येथे मोठ्या दिमाखात करण्यात आले, यामध्ये भारतासह जगभरातील १३ देशातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, नेते, धोरणकर्ते आणि सहकारी तज्ञ एकत्र आले होते. परिषेदेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अप्राका (ए.पी.आर.ए.सी.ए), बँकॉकचे महासचिव डॉ. प्रसून कुमार दास, एन.आय.आर.डी आणि पी.आर हैदराबादचे महासंचालक आय.ए.एस डॉ. जी. नरेंद्र कुमार, आय.आय.एम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, एन.सी.यु आयच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावित्री सिंग, सानासा श्रीलंकेच्या व्यवस्थापकीय संचालक समदानी किरीवांडेनिया आणि सिकटॅब व वामनिकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील परिषदेला भारताच्या कानाकोपऱ्यातून सहकार क्षेत्रातील तज्ञांनी विशेष उपस्थिती लावली होती.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. हेमा यादव म्हणाल्या कि, सहकार चळवळ केवळ आर्थिक उपक्रमांपुरती नाही, हि चळवळ म्हणजे समाजातील लहानमोठ्या समुदायांना सशक्त करणे, सामाजिक समानता सुनिश्चित करणे आणि टिकाऊपणा वाढवणे आहे. ही परिषद भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे. जिथे डिजिटल परिवर्तन आणि सहकारी तत्त्वे लवचिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी काम करेल. सदरील ही परिषद पुढील तदोन दिवस (१४-१५ फेब्रुवारी २०२५) सुरू राहील, ज्यामध्ये परस्पर चर्चा, तपशिलावर अभ्यास आणि आर्थिक सामाजिक प्रगतीत सहकारी संस्था आघाडीवर राहतील याची खात्री करण्यासाठी धोरणात्मक कृती योजना सादर केल्या जातील.
दास म्हणाले कि सहकार क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे भारताच्या खेडे गावापासून ते शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्द झाल्या आहेत. भारतात आलेली हरती क्रांतीने देशाला वेगळ्या स्थावर ती घेवून गेली. आता सर्वात महत्वाचे म्हणजे डिजिटल क्रांतीमुळे शहर आणि गाव यांना जोडण्यासाठी डिजिटल हे महत्वाचे माध्यम बनले आहे. डिजिटल क्षेत्रात नवनवीन होणारी संशोधन यामुळे सहकार क्षेत्राला डिजिटलमुळे मोठी ताकद मिळाली आहे. डिजिटलमुळे सहकार क्षेत्र जगभरात पोहचले असून याचा फायदा सहकार क्षेत्राला झाला आहे.
मेत्री म्हणाले कि भारत देश हा जगाचा मध्यबिंदू बनला आहे. जेव्हा डिजिटलायझेशनचा विचार केला जातो तेव्हा ते यु. पी. आय. असो किंवा डी. सी असो, यामध्ये भारताचा जगभरात दबदबा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे मोठ्या प्रमाणात ते कृषी अर्थव्यवस्था आहे. तिला तिचे बळकटीकरण करण्यासाठी म्हणून तिला कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची आहे. त्यामध्ये गावांपैकी सर्वात लहान गावांना मोठ्या गावाशी जोडण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा सहकार क्षेत्रात त्याचा फायदा झाला.
समदानी म्हणाल्या कि सहकार क्षेत्रात भारताचा मोठा टक्का आहे. आम्ही भारतासारख्या बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या बाजूला राहतो. सहकार क्षेत्रातील अनेक बारकावे आम्ही भारत देशाकडून शिकत आहेत. श्रीलंका देश भारताला सदैव सहकार क्षेत्रात मोठे होताना पाहताना आम्हाला त्याचा आनंद होईल. आशिया खंडातील भारत देशाने जगभरात त्याचे नाव लौकिक केले आहे.
सावित्री सिंह म्हणाल्या कि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (सिक्कटॅब) ची स्थापना १९५८ मध्ये झाली. ही संस्था दरवर्षी २०० हून अधिक कार्यक्रम आयोजित करते. सहकार क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे देशभरातील क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन कार्यक्रम तसेच दरवर्षी सात ते आठ हजार व्यक्तींना प्रशिक्षण देते. सदरील संस्था नऊ दशकांहून अधिक काळ सहकारी संस्थांना प्रोत्साहन आणि बळकट करण्यात आघाडीवर आहे. परिषदेचे आभार डॉ. शंतनू घोष यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सिकटॅब परिषदेचा समारोप केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार
१५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३, वा. तीन दिवसीय परिषदेच्या समारोप होईल. समापन समारंभाचे प्रमुख पाहुणे मुरलीधर मोहोळ, भारत सरकारचे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री असतील. या कार्यक्रमात भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे सहसचिव सिद्धार्थ जैन, आणि डॉ.उमाकांत दास, इंस्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद (आय.आर. एम. ए.) संचालक, यांच्यासह सन्माननीय अतिथी देखील उपस्थित असतील. समापन भाषण डॉ. हेमा यादव, संचालक, वामनिकॉम आणि सिकटॅब देतील.