पंढरपूर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडिया सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गोरक्ष विलास गायकवाड यांची निवड

पुणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडिया सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार गोरक्ष विलास गायकवाड यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या मान्यतेने पुणे शहराध्यक्ष अनिल मोरे यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमात निवड जाहीर केली.

स्वेरी कॉलेज गोपाळपूर, ता.पंढरपूर येथे संपन्न झालेला “महा गौरव पुरस्कार 2025” भव्य आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या थाटामाटा पार पडला. हा पुरस्कार सोहळा आपली चळवळ वृत्तपत्र समूह व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली तसेच प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गोरख गायकवाड हे आपली चळवळ साप्ताहिक चे संपादक असून आजवर त्यांनी लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे.

सोलापूर जिल्ह्यात डिजिटल मीडिया पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम जिल्हाध्यक्ष यांनी करावे, तसेच या भागातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकजूट निर्माण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले.