पुणे

छत्रपती शिवाजीमहाराज लोककल्याणकारी राजे : प्राचार्य दत्तात्रय जाधव

हडपसर,वार्ताहर. शिवाजीमहाराज केवळ वंशपरंपरागत राजे नव्हते तर ते स्वराज्यसंस्थापक होते. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजीमहाराजांनी रयतेचं राज्य उभारलं.रयतेची काळजी घेतली.शिवरायांचा आदर्श घेऊन आपण समाजासाठी काम करावे असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यालयातील कलाशिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी शिवगीत सादर केले. व साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्याभिषेक व शिवचरित्रावर आधारित नृत्य सादर केले.सृजन कुंभार,वेदांत ढोले व शौर्य येलूतवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रविंद्र भोसले यांनी शिक्षक मनोगतात शिवाजीमहाराज यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेतला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, संस्थेचे आजीव सेवक अनिल मेमाणे,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,धनाजी सावंत, शिवरायांच्या वेशभूषेतील विद्यार्थी शिवम कोल्हे,यश नलवडे,जिजाऊंच्या वेशभूषेतील आर्यन गायकवाड व मावळ्यांच्या वेशभूषेतील अनेक विद्यार्थी,
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली डेरे यांनी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व सविता पाषाणकर यांनी केले.तर आभार प्रतापराव गायकवाड यांनी मानले.