हडपसर : ” जागतिक महिला दिन हा एक दिवसाचा नाही, तर जीवनाचा रोजचा उत्सव आहे. महिलांनी ज्ञान व मेडीटेशनच्या आधारे आपल्यातील सकारात्मक भावना, ऊर्जा आणि कंपना द्वारा भारताला जगात स्वर्णिम आणि शक्तिशाली बनवावे “, असे आवाहन वरिष्ठ राजयोगिनी बी. के. सीमा दीदी यांनी केले. प्रजापिता ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्व् विदयालयाच्या सातववाडी, हडपसर येथील मध्यवर्ती सेवा केंद्राच्या प्रकाशमणी भवन सभागृहामध्ये जागतिक महिला दिना निमित्त आयोजित महिला मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
मेळाव्यात बहुजन समाज कल्याण राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेल्या रुपाली निंबाळकर -देशमुख आणि ज्ञान विज्ञान प्रतिष्ठानच्या सहसचिव, कवियत्री आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या गणदास तसेच डान्स अकॅडेमीच्या साक्षी आबनावे यांचा बी के. सीमा दीदी यांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ. ऐश्वर्या गणदास म्हणाल्या,” कलियुगात प्रत्येकाला आपल्या आयुष्यात संकटाचे पेपर्स येत असतात.. पण केवळ परमात्मा शिवबाबा यांचे ज्ञान आणि मेडिटेशन याच्या अनुभवाने अशा पेपर्स मध्येही आपल्याला सहीसलामत पास होता येतं. यामुळे प्रत्येकाने हे मोफत ज्ञान व मेडिटेशन शिकून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे.
” याप्रसंगी, रुपाली निंबाळकर – देशमुख,बी. के. विजया माता, बी. के. स्नेहा माता, बी. के. अर्चना बहेन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात बाल कलाकार सावी आणि किशोरी कलाकार प्राजक्ता व धनश्री यांनी आपली नृत्य कला सादर केली. मेळाव्याचे संयोजन बी. के.शामल , बी. के. शालन, बी. के. शिल्पा व बी. के. दामिनी यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना गायकवाड यांनी केले.