पुणे

वाढत्या तापमानावर सीड बाॅलचा उपाय; विजयमाला कदम कन्या प्रशालेचा उपक्रम.

पुणे / प्रतिनिधी : (विलास गुरव) भारती विद्यापीठाची सौ विजयमाला कदम कन्या प्रशालेत पर्यावरण रक्षण जागरूकता देशी बीजेचे संवर्धन व जागतिक तापमान वाढी वरील उपाय म्हणून ३०००सीड बॉल तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माती राख शेण व इतर सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या ओल्या मातीच्या बॉलमध्ये देशी बीज टाकून हे सिडबॉल तयार करण्यात आले पावसाळ्यात शालेय परिसरात तसेच छोट्या टेकडीवरती नैसर्गिक पाण्याच्या उपलब्ध स्तोत्रामध्ये हे बॉल टाकून हरित आवरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या उपक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिकासौ वंदना देशमुख यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर सौ शितल विश्वासराव यांनी प्रकल्पाच्या कारवाईसाठी उत्तम असे नियोजन केले इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता सुमारे ३००० च्या वर सिडबॉल तयार करण्यात आले प्रशाली सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते सर्व यावेळी पर्यावरण रक्षक वृक्षारोपण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली.