पुणे/प्रतिनिधी
तथाकथित स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या विरोधात केलेल्या हिनपातळीवरील अपमानास्पद वक्तव्याविरोधात पुणे शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे शहर शिवसेनेने केली आहे.
कुणाल कामरा याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर वैयक्तिकरित्या हिनपातळीवर जाऊन अपमानास्पद, अवमानकारक आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे. या कृत्यामुळे केवळ उपमुख्यमंत्री साहेबांचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. कुणाल कामराने समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) आणि सार्वजनिक व्यासपीठावर जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करत त्यांच्याबद्दल अश्लील, अवमानकारक आणि बदनामीकारक भाष्य केले आहे. हे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून, शिवसेनेच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.
या संदर्भात शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी तक्रार दिली असून कुणाल कामरा याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि आयटी कायदा अंतर्गत कलम 499 – बदनामी करत कोणत्याही व्यक्तीबद्दल असत्य, खोटे किंवा मानहानीकारक वक्तव्य करणे, कलम 500 मानहानीसाठी शिक्षा,कलम 499 अंतर्गत दोषी आढळल्यास कलम 500, कलम 504 शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान, कलम 504,. कलम 505(2) द्वेष निर्माण करणारे वक्तव्य, कलम 505(2) अंतर्गत शांतता भंग आणि अपमान करणे, कलम 153(A) समाजात वैमनस्य पसरविण्याचा प्रयत्न करत धर्म, जात, भाषा किंवा राजकीय विचारांवरून द्वेष पसरवणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे,कलम 506 चिथावणी देत धमकी देणे, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 – कलम 66(A) ऑनलाइन माध्यमातून द्वेषपूर्ण आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे या नमूद केलेल्या सर्व कलमांच्या अंतर्गत कुणाल कामरा याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याच्या समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह पोस्ट्स, व्हिडिओज आणि भाष्य यांची तांत्रिक तपासणी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असेही या तक्रारीत म्हटले आहे.
शिवसेना हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, तो लाखो शिवसैनिकांच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. कुणाल कामरासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केल्यास त्याचा तीव्र निषेध करण्यात येईल, यापुढे शिवसैनिकांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी पुणे शहर शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर घुले, शिवसेना कार्यालय प्रमुख सुधीर जोशी, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुनाईत, उपशहर प्रमुख प्रमोद प्रभुणे,सुधीर कुरुमकर, गौरव साईनकर, संजय डोंगरे, शहर संघटक आकाश रेणुसे,विभाग प्रमुख नितीन लगस,महेंद्र जोशी, राजाभाऊ परदेशी,आरिफ पटेल व अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.