पुणे ः आज मुलांची घरातील भाषा आणि शाळा-महाविद्यलयातील ज्ञानाची भाषा यात भिन्नता आढळते. इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी मराठी मातृभाषेपासून दूर जाताना दिसत आहेत. मातृभाषेचे महत्त्व घरातूनच सांगणे आवश्यक आहे. नवीन पिढीला मराठी भाषेवर मनस्वी प्रेम करायला शिकवावे लागेल. त्यांना मातृभाषेत विचार करू देणे आणि अभिव्यक्त होऊ देणे ही काळाची गरज आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था पुणे, बचपन वर्ल्ड फोरम, पुणे आणि समाजसुधारक कै. सौ. शैलाताई रतन माळी स्मारक समिती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सत्यशोधक बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा स्मिता वाघ, सचिव प्राचार्य रवींद्र वाघ, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक जयंत हिरे, युनिकॉर्न रिअॅलिटीच्या उपाध्यक्षा रूपाली पवार, स्वाती पिंगळे, समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण देवरे, डॉ. नलिनी चौधरी, स्मिता गायकवाड, अर्चना गोजमगुंडे, माजी नगरसेविका उज्वला जंगले, डॉ. दिलीप गरुड , मकरंद टिल्लू, अनिल गुंजाळ, बंडा जोशी, डॉ. संदीप सांगळे, डॉ. प्रतिमा जगताप, उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक सेवा पुरस्कार-२०२५चे मानकरी ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे,
अॅड. विष्णू तुपे, सहप्राध्यापक चेतन दिवाण, एकपात्री कलाकार मेघना झुझम, उद्योजिका सरिता चितोडकर, डॉ. सुभद्रा सिन्हा, डॉ. रिचा पुरोहित, डॉ. अनुजा रेड्डी, साहित्यिक डॉ. बापुराव देसाई, प्राचार्य नामदेवराव शेंडकर, सेवानिवृत्त शिक्षिका आसावरी मुजुमदार, ज्येष्ठ शिक्षक अनिल दरेकर, ज्येष्ठ शिक्षिका रेश्मा सातपुते, लिपिक सायली देवरे, सेविका रेखा सुखलाल माळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.