प्रतिनिधी -स्वप्नील कदम
लोणी काळभोर -स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन महाराष्ट्र अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभा,दि. ६ एप्रिल २०२५ रोजी लोणी काळभोर पुणे येथे आयोजित केली होती.,या सभेमध्ये कार्यकारणी निवड महाराष्ट्र स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन लोणी काळभोर पुणे येथे संपन्न झाली,वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री संजय संतोष जीनवाल, उपाध्यक्ष श्री.संतोष बाबा गलांडे व सचिव श्री.कुमार शंकर उगाडे,
सहसचिव गुंडिबा भरत मदने, खजिनदार अजय प्रकाश सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र मध्ये सॅम्बो या खेळाला उच्च प्रगतीवर नेण्यासाठी व या खेळाचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रभर करण्यासाठी या सभासदांची निवड करण्यात आली आहे. या सभेला उपस्थित नागपूर जिल्ह्याचे सचिव श्री. अमित ठाकूर, पुणे जिल्ह्याचे सचिव सौ. रागिणी उगाडे, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सागर बलभीम गोडसे व सचिव श्री. संतोष बाबा गलांडे, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे सचिव प्रियंका तरटे, नांदेड जिल्ह्याच्या सचिव सौ. राणी राठोड, परभणी जिल्ह्याचे सचिव श्री. संदीप लटपटे, पिंपरी-चिंचव मनीषा पाटील मॅडम हे सर्व मान्यवर उपस्थित होते.