पुणेमहाराष्ट्र

रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती करणे गरजेचे : उपसभापती नीलम गोऱ्हे किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन

मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू असतात.त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची मुले देखील असतात,त्या महिलांची मुले सांभाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक महिला दिली पाहिजे,अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याकडे कार्यक्रमा दरम्यान शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. हा निर्णय घेतल्यास राज्यभरातील महिला भगिनी आपल्या निश्चित आशीर्वाद देतील,अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वाघोली येथे किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.शिवसेना पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासह आजी माजी शिवसैनिक,नागरिक उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर लोकसभा महिला संपर्कप्रमुख सारिका पवार यांनी केले होते.तर यावेळी किडीलँड्स प्रीस्कूल शाळे च्या संस्थापिका सारिका पवार यांच्या आजवरच्या कार्याचा उल्लेख करीत पुढील वाटचालीसाठी नीलम ताई गोऱ्हे आणि ना.श्री. भरत गोगावले यांनी शुभेच्छा देखील दिल्या.

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणल्या,या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना वाघेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि अंत्यत प्रसन्न वाटलं,तसेच माझे वडील दिवाकर गोऱ्हे यांनी याच वाघोली भागात काम केल,ती त्यांची कर्मभूमी होती असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत,ग्रामपंचायतीच्या बागेत मुलांसाठी झोके, सी-सॉ, बाक यांसारखी खेळणी तसेच महिलांसाठी चालण्यासाठी व खेळण्यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार निधीतून पाच लाख रुपये देण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब कोणाचेही काम असो की कार्यक्रम असो त्या एकनाथ शिंदे हे जातात.त्या प्रमाणे भरत गोगावले आपण आला आहात, व्याघ्रेश्वराने तुमच्या अनेक इच्छा पुर्ण केल्या आहेत.पण तुमची एक ईच्छाही लवकर पूर्ण होवो,असे नीलम ताई गोऱ्हे म्हणाताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नीलम ताईंनी बच्चे कंपनीशी साधला संवाद

या कार्यक्रमाच्या ठिकाणी लहान मुले मोठ्या प्रमाणावर आली होती.त्या मुलांकडे पाहत,नीलम ताई गोऱ्हे म्हणल्या,मी मराठी शाळेत शिकले.त्यावेळी आम्हाला आमच्या बाई किती किती म्हणायच्या आणि आम्ही छान छान असे म्हणत असायचो,अशी बालपणीची आठवण सांगत,नीलम ताईंनी बच्चे कंपनीशी संवाद देखील साधला.

कार्यक्रमात रामभाऊ दाभाडे (मा. जि.प. सदस्य व मा. सरपंच वाघोली), प्रमोद नाना भानगिरे (शिवसेना शहराध्यक्ष), जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, सहसंपर्कप्रमुख सौ. सुदर्शना त्रिगुणाईत, जिल्हाप्रमुख सौ. सिमा कल्याणकर, तालुका प्रमुख श्री. रामभाऊ सासवडे, श्री. विपुल शितोळे, जिल्हा प्रमुख सौ. मनीषा परांडे आणि जिल्हा प्रमुख (पंढरपूर) सौ. आरती बसवंती यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.