पुणे

भाजप नगरसेविकेचा प्रताप ; महिला डॉक्टरला केली मारहाण; गुन्हा दाखल

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

ससून रुग्णालयात महिला डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणी पुणे महापालिकेतील नगरसेविका आरती सचिन कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा विभागात घडली.
याप्रकरणी डॉ. स्नेहल अशोक खंडागळे (वय 26 रा. बी जे मेडिकल कॉलेज नर्सिंग हॉस्टेल, मूळ रा. जालना ) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास डॉ. स्नेहल खंडागळे या एका गंभीर रुग्णावर उपचार करीत होत्या. त्याचवेळी नगरसेविका आरती कोंढरे या त्याठिकाणी आल्या आणि तेथील कॉटवर असलेल्या रुग्णाविषयी विचारणा करू लागल्या. मोठ्याने आवाज करून ‘येथे कोण डॉक्टर आहेत ? या पेशंटकडे कोण पाहतय ?’ अशी विचारणा करीत आरडाओरड करू लागल्या.
डॉ. स्नेहल तिथे आल्या असता आरती कोंढरे यांनी या पेशंटवर त्वरित उपचार करण्यास त्यांना सांगितले. त्यावर डॉ. स्नेहल यांनी सदरच्या पेशंटवर प्राथमिक उपचार करून त्याच्या डोक्याला टाके टाकल्याचे तसेच त्याला सिटी स्कॅन करण्यासाठी पाठवायचे असल्याचे कोंढरे यांना सांगितले. परंतु, कोंढरे यांनी मोठमोठ्याने ओरडून पेशंटला लवकर घेऊन जाण्यास सांगितले. डॉ. स्नेहल यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता. आरती कोंढरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. तसेच मोबाइलवर शूटिंग करण्यास सुरुवात केली. डॉ. स्नेहल यांनी त्यांना मनाई करून मोबाइलवर हात आडवा धरून शुटींग रोखण्याचा प्रयत्न केला असता आरती कोंढरे यांनी डॉ. स्नेहल यांच्या गालावर हाताने मारले.
त्याचवेळी आरती कोंढरे यांच्यासोबत असलेल्या सचिन कोंढरे यांनी त्यांना समजावून सांगून तेथून बाहेर नेले. या प्रकरणी नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

An outstanding share! I’ve just forwaeded tis onnto a
colleaghue who hhas bwen conducting a little ressearch on this.

Andd hhe in fct bought mee breakfast simply because I found itt forr him…
lol. So let mme reword this…. Thank YOU for tthe
meal!! Butt yeah, thanx for spending some ttime tto talkk about tthis marter here
onn yor website.

10 months ago

¿Cómo sé con quién está chateando mi esposo o esposa en WhatsApp? Entonces ya estás buscando la mejor solución. Escuchar a escondidas en un teléfono es mucho más fácil de lo que cree. Lo primero que debe instalar una aplicación espía en su teléfono es obtener el teléfono objetivo.

10 months ago

¿Existe una mejor manera de localizar rápidamente un teléfono móvil sin que lo descubran?

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x