जालना

राज्यमंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर; जालन्यातील राजकारण तापले; दानवेना जोरदार धक्का

जालना (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होऊनही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरुद्ध जालन्यातील शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुकारलेले बंड अद्याप शमलेले दिसत नाही. गुरुवारी खोतकर यांनी अचानक औरंगाबादेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांची भेट घेत, तब्बल तासभर चर्चा केली. या बैठकीनंतर सत्तार यांनीही ‘दोन दिवसांमध्ये खोतकरांबद्दल गोड बातमी देतो’, असे पत्रकारांना सांगत पुन्हा एकदा खोतकर हे जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढू शकतात, असे संकेत देत दानवे यांचे ‘टेन्शन’ वाढविले आहे. जालन्यात दानवे आणि खोतकर यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. आपण दानवे यांना पाडणारच, त्यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढणार, असे दोन महिन्यांपूर्वीच खोतकर यांनी जाहीर केले होते. युती होणार नाही, असे गृहीत धरून खोतकर यांनी लोकसभेची तयारीही सुरू केलेली होती. अचानक युती झाली. मात्र, युतीच्या घोषणेनंतरही खोतकर यांनी माघार घेतली नाही. हीच संधी साधून काँग्रेसने खोतकरांवर जाळे टाकण्यास सुरुवात केली. खोतकर लढले तर दानवेंना अडचणीचे ठरू शकते,हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खोतकर यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर खोतकर आणि दानवे हे दोघे दोन-तीन वेळा एकाच व्यासपीठावरही आले. त्यावरून खोतकरांचे बंड शमले असे वाटत होते. मात्र, गुरुवारी पुन्हा एकदा खोतकर आणि आ. सत्तार यांच्या भेटीने भाजपच्या गोटात खळबळ उडाली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

Hello, I enjoy гeading through your post. I like to write a little ⅽomment tto sⲣport you. http://Maristasmurcia.es/inforWiki/index.php?title=Tremendous_Heroes_Coloring_Pages

1 year ago

I read this piece of writing completely about the comparison of hottest and
preceding technologies, it’s awesome article.

1 year ago

A motivating discussion is definitely worth comment.
I believe that you need to write more about this issue, it might not be a taboo subject but typically folks
don’t discuss these topics. To the next! Best wishes!!

1 year ago

We stumbled over here from a different page and thought I might check things out.

I like what I see so i am just following you. Look forward to going over your web page again.

9 months ago

If you’re wondering how to find out if your husband is cheating on you on WhatsApp, I might be able to help. When you ask your partner if he can check his phone, the usual answer is no.

9 months ago

Some private photo files you delete on your phone, even if they are permanently deleted, may be retrieved by others.

Comment here

6
0
Would love your thoughts, please comment.x
()
x