पंढरपूर :- (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात हार-फुले विक्री करणाऱ्या वृध्द महिलेस पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यावरून आमदार भारत भालके आणि पो.नि. विश्वास साळोखे यांच्यात वाद झाला होता. गुरुवारी ५ वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. या वादावरून आमदार भारत भालकेंसह सहा जणांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पो.नि. साळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आमदार भारत भालके, आशा बागल, संदीप मांडवे, नागेश यादव, कृष्णा वाघमारे आणि लेंगरे यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध केला. आणि मंदिर परिसरात कारवाई का करतोस? असा जाब विचारत कारवाई करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असे म्हणत शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच उपस्थित जमावास चिथावणी देण्याचे काम केल्याचा आरोप या फिर्यादी मध्ये करण्यात आला आहे. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. साळोखे यांच्या तक्रारी वरून आमदार भालकेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. भादवि ३५३,१८६,१८९,२९४,१४३,१४७,१४९,१०९,११४,११७,मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या एका वृध्द महिलेला पोलिसांनी काठी मारल्याची तक्रार या महिलांनी आमदार भारत भालकेंच्या कानावर घातली होती. यावर आमदार भालकेंनी सायंकाळी ५ च्या दरम्यान नामदेव पायरीजवळ या भागातील विक्रेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश भस्मे यांना या बैठकीला बोलावून घेतले होते. यावेळी विक्रेत्यांवर होणारी कारवाई आणि वृध्द महिलेला झालेली पोलिसांची मारहाण यावरून आमदार भालके आणि पो.नि. साळोखे यांच्यामध्ये वादावादी झाली होती.
दरम्यान या परिसरात व्यवसाय करणाऱ्या महिलांनी देखिल पो. नि. साळोखे यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडेंना दिले आहे.
https://youtu.be/peslvgFC4EI
Very good blog! Do you have any hints for aspiring writers?
I’m planning to start my own site soon but I’m a little lost on everything.
Would you suggest starting with a free platform like
Wordpress or go for a paid option? There are so many choices out there that
I’m completely confused .. Any recommendations? Thanks a lot!
Se você está se perguntando como descobrir se seu marido está traindo você no WhatsApp, talvez eu possa ajudar. Quando você pergunta ao seu parceiro se ele pode verificar seu telefone, a resposta usual é não.
Alguns arquivos de fotos particulares que você exclui do telefone, mesmo que sejam excluídos permanentemente, podem ser recuperados por outras pessoas.