पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी पणजी येथील निवासस्थानी निधन झाले. कालपासून मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, आज सकाळपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. अखेर ही भीती खरी ठरली असून काही वेळापूर्वीच मनोहर पर्रिकर यांची प्राणज्योत मालवली.
President of India announces that Goa Chief Minister Manohar Parrikar has passed awaypic.twitter.com/PS8ocF395S
— ANI (@ANI) March 17, 2019
काही महिन्यांपूर्वी मनोहर पर्रिकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ते उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. उपचार घेऊन भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार पाहायला मिळाले होते. परंतु तरीही पर्रिकर यांनी नेटाने आपले काम सुरु ठेवले होते. मध्यंतरी त्यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला होता. अनेकांनी पर्रिकरांच्या या दांडग्या इच्छाशक्तीचे कौतुकही केले होते.
Some software will detect the screen recording information and cannot take a screenshot of the mobile phone. In this case, remote monitoring can be used to view the screen content of another mobile phone.