महाराष्ट्र

बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून प्रभाकर देशमुख? “विजयसिंह मोहिते पाटील यांना” डावलणार?

मुंबई : माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये माढातून उमेदवार कोण? यावर खदखद सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज तिसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माढाच्या उमेदवारीची देखील घोषणा होऊ शकते. यावेळी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते -पाटील यांनी आता अकलूज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी मोहिते-पाटील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून पुढील रणनिती ठरण्याची शक्यता आहे.
माढामधून प्रभाकर देशमुख यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे नाराज विजयसिंह मोहिते – पाटील हे अन्य पर्यायाचा विचार करू शकतात का? तसेच केवळ पक्षावर दबावासाठी सर्व सुरू आहे? याकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही

माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. दरम्यान, मोहिते-पाटील यांनी त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. पण, राष्ट्रवादीतील नेत्यांचा मात्र त्याला रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे.
त्यानंतर आता विजयसिंह मोहिते-पाटील आता काय भूमिका घेणार? तसेच माढातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? हे पाहावं लागणार आहे. यापूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा देखील रंगली होती. माढामधून शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पवारांवर भाजपनं देखील टीका केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्व गोष्टींचा विचार करता शरद पवार यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Why viewers still use to read news papers when in this technological globe
everything is accessible on web?

10 months ago

The most common reasons for infidelity between couples are infidelity and lack of trust. In an age without cell phones or the internet, issues of distrust and disloyalty were less of an issue than they are today.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x