पिंपरी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात देशात असंख्य लोकाभिमुख विकास कामे झाली. शिवसेना – भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी ही विकास कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. युतीचा धर्म पाळून पुणे जिल्ह्यातील शिवसेना – भाजपचे चारही उमेदवार निवडून आणावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन शिवसेना उपनेत्या आमदार डॉ.नीलम गोर्हे, पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. शिवसेना – भाजपचे कार्यकर्ते विचाराला बांधील आहेत. शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. गेल्यावेळी पेक्षा यंदा जास्त मताधिक्याने युतीचा खासदार निवडून आणू , असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांची बैठक मंगळवारी (दि.१९) आकुर्डीत पार पडली. शिवसेना उपनेत्या आमदार डॉ.नीलम गोर्हे, पालकमंत्री गिरीश बापट यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, भाजप संघटनमंत्री रवी अनासपुरे, मावळचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसघांचे खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार अमर साबळे, शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, भाजप प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, अमित गोरखे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटक अॅड. उर्मिला काळभोर, तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांच्यासह शिवसेना – भाजप नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना उपनेत्या आमदार डॉ.नीलम गोर्हे म्हणाल्या, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे अनेक वर्षांपासून समाजकारण, राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादीला १५ वर्ष जी कामे करता आली नाहीत ती युती सरकारने साडेचार वर्षात केली आहेत. पिंपरी – चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय दिले. अवैध बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा केला. शास्तीकर कमी केला. त्यामुळे शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांनी विकास कामे जनतेपर्यंत पोहचवावित. राष्ट्रवादीला कुटुंबातील उमेदवार द्यावा लागला. त्यातून त्यांची हतबलता दिसून येते. पवना बंद जलवाहिनीसाठी मावळात शेतकर्यांचे रक्त सांडले. त्यामुळे राष्ट्रवादीचे शेतकर्यांविषयी पुतना मावशीचे प्रेम समोर आले आहे. शिवसेना – भाजप युती झाल्यामुळे जनतेला आनंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनापासून काम कावे, असे आवाहनही नीलम गोर्हे यांनी केले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. मतभेद संपले आहेत. भविष्यात एक कुटुंब म्हणून कार्यकर्ते् यांंनी काम करायचे आहे. शिवसेना – भाजप कार्यकर्ते विचाराला बांधील आहेत. आता सर्वांनी एकदिलाने, एका मनाने कामाला लागायचे आहे. वेंâद्र – राज्य सरकारच्या हरेक योजना, काम घेऊन नागरिकांपर्यंत पोहचायचे आहे. वेंâद्र आणि राज्यातील युती सरकारमुळे पुणे जिल्ह्यात ६० हजार कोटी रुपयांची विकास कामे चालू आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही ओरडू द्या, जनता युतीसोबतच आहे. शिवसेना – भाजप युती कार्यकत्र्यांच्या जोरावर निवडणूक लढविते. युतीचा आत्मा कार्यकर्ता आहे. युतीचे कार्यकर्ते तळमळीचे आहेत. विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याशिवास कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. लोकसभा निवडणूक आपण जिंकणार आहोत. पण गाफील राहयाचे नाही. सहज घ्यायचे नाही. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचायचे आहे. उमेदवार कोण आहे, हे पाहू नका, युतीचा उमेदवार आहे, हे पाहून काम करा, असेही बापट म्हणाले.
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम म्हणाले, दोन्ही पक्षाच्या कार्यकत्र्यांचे रुसवे – फुगवे संपले आहेत. शिवसेना – भाजप युती २७ वर्षांची आहे. देशात सर्वांत दृढ आणि भक्कम असलेली ही एकमेव युती आहे. युतीसाठी मशागत केली आहे. युतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन हिंदुस्थान घडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिवसेना खासदारांना निवडून द्यायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने, एक मनाने, एकत्र होऊन काम करण्याची गरज आहे. महापौर राहुल जाधव, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मनोगत व्यक्त केले.
मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसला मुक्त केले. आता लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्हा ’पवारमुक्त’ करायचा आहे. आयात उमेदवाराला निवडून द्यायचे नाही. त्यांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी केली. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना – भाजप युती मताधिक्याने जिंकणार आहे. मागच्या पंचवार्षिकपेक्षा यंदा जास्त ताकदीने निवडणुकीला सामोरे जायचे आहे. गेल्यावेळी पुणे जिल्ह्याने युतीचे तीन खासदार दिले होते. आता युतीचे चार खासदार निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे. आगामी काळ विकासाचा काळ आहे. देश मजबूत करायचा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेना खासदारांनाच संसदेत पाठवायचे आहे.
It’ѕ an remarkable article designed for ɑll the weƅ visitors; they will get benefit from it I am sure. http://mestraining.ru/wiki/index.php/Slot_Bebas_Slot_Gacor_Online_Demo_Terbaik
Greetings! I know this is kinda off topic but I was wondering
if you knew where I could find a captcha plugin for my
comment form? I’m using the same blog platform as yours and I’m having problems
finding one? Thanks a lot!
Les raisons les plus courantes de l’infidélité entre couples sont l’infidélité et le manque de confiance. À une époque sans téléphones portables ni Internet, les problèmes de méfiance et de déloyauté étaient moins problématiques qu’ils ne le sont aujourd’hui.