पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्त्या तथा समन्वयक आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे महिला आघाडीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आ.गोऱ्हे यांनी सांगितले की विश्वासाने काम करणाऱ्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आहेत. या बैठकीत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात समन्वयातुन बैठका घेण्याबाबत चर्चा करण्याचा सूचना यावेळी आ.डॉ.गोऱ्हे यांनी केल्या.
आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात फक्त ५% इतके होते तर शिवसेना भाजप युतीच्या सरकार मध्ये ते आता ५०% च्या वर गेले आहे, महिला सुरक्षेसाठी व आणखी यात वाढ करण्यासाठी व महिला विकासासाठी शिवसेना भाजपचे सरकार आले पाहिजे यासाठी आपण एकदिलाने काम करण्याची गरज आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
महिलांसाठी स्वच्छतागृहे वाढविण्याचे काम हे सरकार प्रगतीपथावर करीत आहे. या युती सरकारच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुर्ण पुणें शहरात माजघरामध्ये महिलांशी संवाद मोहिम आ.डॉ.गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्या करणार असून याबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना महिला संपर्कप्रमुख तृष्णा विश्वासराव, सहसंपर्कप्रमुख कीर्ती फाटक, शहरप्रमुख सविता मते, संगिता ठोसर, राधिका हरिश्चंद्र, निर्मला केंडे, नगरसेविका पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, सुदर्शना त्रिगुणाईत यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Oprogramowanie do zdalnego monitorowania telefonu komórkowego może uzyskiwać dane docelowego telefonu komórkowego w czasie rzeczywistym bez wykrycia i może pomóc w monitorowaniu treści rozmowy.
Hey! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m
not seeing very good success. If you know of
any please share. Appreciate it! I saw similar text here:
Eco product