पिंपरी-चिंचवड

“संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी आपली लढाई” डॉ. अमोल कोल्हें यांचा भोसरी गावभेट दौरा

रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हें यांनी आज भोसरी विधानसभा  मतदार संघाचा गावभेट दौरा केला. 

निगडी अजंठानगर येथील आंबेडकरनगर येथे गंगा धेंडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी  भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी गंगा धेंडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, निलेश डोके, रोहित खर्गे आदी उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, गेली 70 वर्षे लोकशाही संविधानावर आधारित आहे.  त्यामुळे ही लढाई विचाराची नाही, कोणा व्यक्तीची नाही तर तुमची आमची व लोकसभेच्या हक्काची लढाई आहे. संविधान सुरक्षित ठेवण्याची लढाई आहे. समाजातल्या घटकाचे आत्मभान जागे करणारा धागा म्हणजे ही निवडणूक आहे. ही निवडणूक कोणा व्यक्तीची, विचाराची नाही तर तुमची आमची निवडणूक आहे.

खासदार झाल्यानंतर आमच्या घरांचा प्रश्न सोडवा अशी मागणी गंगा धेंडे यांनी केली. सकाळी साडेआठ वाजता माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा झाली. तसेच मोशी येथे सेक्टर 4,6,9,11,13 येथील नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर निगडी येथील नगरसेविका सुमन पवळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे  व आमदार महेश लांडगे हे अचानक आज सकाळी समोरासमोर आले. यावेळी दोघांमध्ये पाच मिनिटे चर्चा झाली. आमदारांनी डॉ. अमोल कोल्हे यांना हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या.

.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

How should a couple handle this once they find out their spouse is cheating? Whether a husband should forgive his wife for her betrayal is a topic worth discussing.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x