पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा – येस सर, मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात गाड्या उडवून कुणाच्या कपड्यावर चिखलाची बेलबुट्टी करतो रे’ काय अचंबित झालात ना? हा मुलगा नक्की काय वाचतोय? आणि मध्येच सेमिस्टर, येस सर सारखे शब्द कसे आले? अशी प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या ’६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकिज प्रा. लि.’ यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.
या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, वंदना गुप्ते, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, संगीतकार नरेंद्र भिडे गायक जसराज जोशी, आर्या आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर वाद – विवादासाठी प्रसिद्ध आहे, याच पुण्यात ६६ वी कला अर्थात शास्त्रशुद्ध वाद घालण्याच्या शिकवणी भोवती ’६६ सदाशिव’ची कथा असल्याचे या टीजर मधून दिसते. यापूर्वी आलेल्या पोस्टर मध्ये ‘६६ व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!’ अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची जी उत्सुकता निर्माण झाली होती ती या भन्नाट टीजर मधून अधिक ताणली गेली आहे.
’६६ सदाशिव’ चित्रपटात मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, प्रणव रावराणे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर महेश मांजरेकर, आसावरी जोशी, विजय निकम विशेष भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात तीन गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत आहे. एका वेगळ्या कलेची ओळख करून देणारा ’६६ सदाशिव’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Bu Kompresör Mükemmel Sonuçlar İçin Tasarlanıp, Sadece Sizin İçin Üretildi
200 lt kapasiteli kompresörlerimizle verimli işler yapın. Uygun fiyatlarla sizleri bekliyoruz
Jak para powinna sobie poradzić, gdy dowie się, że ich współmałżonek zdradza? Warto omówić kwestię tego, czy mąż powinien wybaczyć żonie zdradę.