कोल्हापूर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज)-
पतीने घेतलेले कर्ज फेडणे अवघड झाल्यानं कर्जापोटी व अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन, कोल्हापूर शहरात रूईकर कॉलनीतील एका नराधम सावकाराने नवविवाहित आभियांत्रिकी तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. साथीदाराच्या मदतीने संशयिताने पीडित तरुणीला अमानुष मारहाण करून, शरीरावर सिगारेटचे चटके दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनेची गंभीर दखल घेत, शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. कट्टे यांनी पीडित तरुणीसह पतीचा जबाब नोंदवून घेतला. सावकार, दोन साथीदारांना मदत करणार्या एका महिलेचाही सहभाग निष्पन्न झाला आहे, असे कट्टे यांनी सांगितले. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, तरुणीचा पुण्यातील तरुणाशी वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला. घरातून विरोध झाल्याने दाम्पत्याने कोल्हापुरात भाड्याने खोली घेतली. संसारोपयोगी खर्चासाठी दाम्पत्याला पैशांची गरज भासली. पतीने रूईकर कॉलनीतील संशयिताकडून रोज साडेतीन हजार रुपये या दराने 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले. व्याजाचे तीन हप्त्याचे साडेदहा हजार रुपये परत केल्यानंतर पुढील रक्कम देण्यास दाम्पत्यासमोर अडचणी निर्माण झाल्या.
सावकारी कर्ज वसुलीच्या निमित्ताने संशयित दाम्पत्याच्या घरी सतत येऊ लागला. पती, पत्नीला शिवीगाळ, मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले. महिन्यापूर्वी रात्रीच्या सुमाराला संशयित महिलेच्या घरी आला. त्याने तिला घरातून बाहेर बोलावून घेतले. त्याने पतीची चौकशी केली. पती कामावर गेल्याचे समजताच सावकाराने महत्त्वाचे काम आहे, असे सांगून तिला मोटारीतून कळंबा रोडवर नेले. तेथे बीअर पिऊन मोटारीत बलात्कार केला. त्यानंतरही दहशत माजवून तीन, चारवेळा अत्याचार केल्याचे तरुणीने जबाबात म्हटले आहे.
अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन, सावकाराने दोन साथीदाराबरोबर लगट करून देण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी तो साथीदारांसमवेत दाम्पत्याच्या खोलीवर आला. तेथे धुमाकूळ घातला. मित्रांनीही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने या प्रकरणाची जाहीर वाच्यता करण्याची धमकी देताच अमानुष मारहाण करून शरीरावर सिगारेटचे चटके दिले.
महिला पदाधिकारी मदतीला धावल्या
सावकारासह साथीदाराकडून होणार्या त्रासाला वैतागलेल्या तरुणीसह पतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यवाहक गीता हसूरकर, मंगल पवार यांच्याशी संपर्क साधला. अत्याचाराचा घटनाक्रम मांडला. हसूरकर, पवार यांनी पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांना घटनेची माहिती देताच, कारवाईची चक्रे गतिमान झाली आहेत.
здесь вы узнате все необходимое об астрологии
Jeśli Twój mąż usunął historię czatów, możesz także skorzystać z narzędzi do odzyskiwania danych, aby odzyskać usunięte wiadomości. Oto kilka powszechnie używanych narzędzi do odzyskiwania danych: