पुण्यात पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार
पत्नीला घटस्फोट देणार असल्याची बतावणी करत २४ वर्षीय तरुणीवर लग्नाच्या अमिषाने पोलीस कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार अत्याचार केले. त्यानंतर तिच्या खात्यातील १ लाख ८५ हजार रुपये काढून घेत तिची शैक्षणिक कागदपत्रे घेत त्यांचा अपहार केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
सचिन राजाराम कोळी (वय ३३, रा. पंकज अस्मान सोसायटी) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यालाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २७ मे २०१७ ते १५ एप्रिल २०१९ पर्यंत लोहगाव, खराडी, घोरपडीगाव येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सचिन कोळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दरम्यान कोळी याचे लग्नही झालेले आहे. त्याला एक मुलगाही आहे. तर पिडीत तरुणी हिचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले असून कोळी आणि तिच्या काकांची चांगली ओळख आहे. त्यातून दोघांचीही ओळख होती. दरम्यान काही दिवसांनी ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर कोळी याने पत्नीशी आपले पटत नाही. त्यामुळे तिला घटस्फोट देणार असल्याचे सांगत पिडीत तरुणीला लग्नाचे अमिष दाखवले.
त्यानंतर लग्नाच्या अमिषाने २७ मे २०१७ ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिने भेटण्यास नकार दिल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आपण पळून जाऊन लग्न करू असे अमिष दाखवले. तसेच तिच्या खात्यातील १ लाख ८५ हजार रुपये घेतले आणि तिची शालेय व इतर कागदपत्रे घेत त्यांचा अपहार केला. असे पिडीतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान पिडीतीने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन कोळी विरोधात भादंवि ३७६, ३७७, ४०६, ५०६ (१), ५०४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांनी दिली.
Incredible points. Outstanding arguments. Keep up
the amazing spirit.