रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे जिल्ह्यात सध्या शहर आणि ग्रामीण भाग असा पाण्यावरून वाद पाहण्यास मिळत आहे. या पाण्याच्या वादाला सत्ताधारी भाजप कारणीभूत असून धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला असताना देखील धरणातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अशा नियोजनामुळे पुण्यात पाणी समस्या निर्माण झाली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजपवर टीका केली.
रोहित पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर नसतानाही राज्यातील अनेक भागातील प्रत्येक नागरिकाला, शेतकरीवर्गाला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शेतकर्यांच्या जनावरांसाठी चारा, पाणी यावर सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना केल्या जात नाहीत. सरकारकडून वारंवार सांगितले जाते की जलयुक्त शिवारच्या माध्यमातुन कोट्यवधी रूपयांची कामे झाले आहेत. मग त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही प्रमाणात दुष्काळ काळात होण्याची गरज होती. मात्र केवळ घोषणा करायचे काम भाजपने केल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत हडपसर, कर्जत जामखेडमधून निवडणूक लढविण्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. त्यावर पवार म्हणाले की, माझा विधानसभा निवडणूक लढवायचा विचार आहे. मात्र मतदारसंघ वरिष्ठ ठरवतील.
Its like you learn my thoughts! You appear to grasp
a lot approximately this, like you wrote the ebook in it or something.
I feel that you simply can do with some percent to pressure the message house a bit,
however instead of that, that is fantastic blog. A great read.
I’ll certainly be back.
Very interesting info!Perfect just what I was searching for!Leadership