पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन) –
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना त्याचे योग्यm नियोजन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले नाही. त्यामुळेच पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या मी केलेल्या जाहीर टिकेला उत्तर देण्याऐवजी अदखलपात्र अशी संभावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी करून पुणेकरांच्या जीव्हाळ्याच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र पुणेकर जनता त्यांनाच २३ मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकालाच्या
दिवशी अदखलपात्र करेल अशी खरमरीत टीका काँग्रेसचे नेते व काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली. गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आहेत मालकमंत्री नाहीत अशी जोरदार ठीका ही मोहन जोशी यांनी केली.
मोहन जोशी म्हणाले कि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत पुणेकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावला नाही कारण आम्ही पुणेकरांचे हित साधण्यासाठी पाण्याचे नियोजन केले. पालकमंत्री गिरीश
बापट यांनी मात्र ग्रामीण भागात भाजपला मते मिळतील या आशेने पुणेकरांना वेठिस धरून पुण्याच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा बट्याबोळ केला त्यामुळेच पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे या संदंर्भात योग्य खुलासा करण्याऐवजी अदखलपात्रअशी उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांनाच पुणेकर जनता २३ मे रोजी
अदखलपात्र; ठरवेल असे मोहन जोशी यांनी म्हंटले तसेच पुण्याचा पाणीप्रश्नासह, नागरीप्रश्न आणि विकास प्रकल्प यासंदंर्भात आपण पुण्याचे मालकमंत्री म्हणून नाही तर पालकमंत्री म्हणून पुणेकरांच्या हितासाठी काम करायला हवे होते अशी टीका ही मोहन जोशी यांनी केली.
“गिरीश बापट व मोहन जोशी” यांच्यात आरोप प्रत्यारोप पुणेकर बापटांना 23 मे ला अदखलपात्र करतील मोहन जोशी यांचा टोला
Related tags :
Veгy niсe post. I just stumbleԀ upon your weblog and wanted too say that I’ve truly enjoyed surfing
around yoyr bⅼog posts. After all I’ll be subscribing to your feed andd I hoⲣe you wгite again very
soon! http://wiki.qm.uni-siegen.de/index.php/Metode_Untuk_Berhasil_Di_Bocoran_Situs_Slot_Gacor_Hari_Ini_Terbaru
These are really enormous ideas in about blogging. You have touched some nice things
here. Any way keep up wrinting.