रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन –
मावळ आणि शिरूर मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर सर्व ईएव्हीएम मशीन म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशिन्ससाठी पोलिसांकडून ‘थ्री लेयर सिक्युरिटी’ तैनात करण्यात आली आहे. ईव्हीएम ठेवलेल्या संबंधित ठिकाणांची पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दररोज तीनवेळा पाहणी करत आहेत.
बालेवाडी क्रीडा संकुलात बॅडमिंटन हॉलला केंद्र व राज्य राखीव दलासह पिंपरी-चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता दिवसातून तीन वेळा येथील बंदोबस्त तपासण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत.
ईव्हीएम मशीनच्यापासून काही अंतरावर केंद्राच्या राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या गोलाकार तैनात करण्यात आल्या आहेत. या एका तुकडीमध्ये 25 शस्त्रधारी पोलीस आहेत. त्यानंतर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत. यातही एका तुकडीमध्ये 25 शस्त्रधारी पोलीस आहेत. केंद्र आणि राज्य राखीव पोलिसांनी केलेल्या सुरक्षाकडीच्या बाहेर स्थानिक पोलीस पहारा देत आहेत. यामध्ये एक सहायक पोलीस आयुक्त, फोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक आणि तब्बल 204 पोलीस आहेत.
हा सर्व बंदोबस्त दररोज एका वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्फतीने तपासाला जाणार आहे. त्यासाठी दररोज एका वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख ह्या दिवसातून एक वेळा येथे भेट देणार आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी आणि राखीव पोलीस निरीक्षक यांनी दिवसातून दोनवेळा या बंदोबस्ताची पाहणी करावयाची आहे.
प्रामुख्याने स्ट्रॉंग रूमच्या दरवाजांचे सील, तैनात असलेले कर्मचारी, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. तपासणी केलेबाबत व्हिजिट बुकमध्ये नोंद करण्यात येणार आहे. यामध्ये काही गैरप्रकार आढळ्यास अपर पोलीस आयुक्त आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात येणार आहे. तसेच रात्रगस्त दरम्यान उपायुक्त, सहायक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षक हे देखील भेट देऊन बंदोबस्त तपासणार आहेत.
Spam4d sebagai bandar judi slot online
This blog was… how do you say it? Relevant!! Finally I’ve found something that helped me.
Appreciate it!