उस्मानाबाद (वैभव शितोळे पाटील यांजकडून)- कळंब तालुक्यामध्ये दुष्काळाने गंभीर रूप धारण केले असून ९७ गावापैकी १७ गांवात २२ टँकरने पाणी पुरवठा होत आहे,या १७ गावांत पाण्याची समस्या फार मोठी आहे.
कळंब तालुक्यात बोरवेल व विहीरी एकुन ११० अधिग्रहण करण्यात आले आहेत. या ₹द्वारे पाणी पुरवठा होत आहे,पण तेही अपुरेच आहे . गांवातील महिला मे महिण्याच्या रखरखत्या उन्हात दोन किलेमिटर वरुन पाणी डेक्यावर आणत असल्याचे चित्र आहे.
कळंब तालुक्यात चाराछ्यावण्या पाच आहेत १)वाठवडा २)पाटर्डी ३)येरमाळा ४)मोहा ५)चवराखळी या पाच छ्यावण्यात प्रतेकी ३०० जनावरे आहेत .
रखरखत्या उन्हामुळे पाण्याची समस्या गंभीर स्वरुप घेत आहे जनवारंच्या चाऱ्याचा व पाण्याचा ही प्रश्न गंभीर आहे .यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाने तातडीनं अधिक उपाय योजना कराव्यात अशी मागणी सर्वत्र होत आहे.
कळंब तालुक्यात भयानक दुष्काळ ; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
Related tags :
Your positivity and enthusiasm are infectious I can’t help but feel uplifted and motivated after reading your posts