बारामती (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर तसेच अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले या दोघांना बदनाम करून , त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची धमकी देत पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना आज पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बारामतीत ताब्यात घेतले.
याप्रकरणी अण्णासाहेब रुपनवर( रा. कुरबावी, ता माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे. `तुमच्या विषयीच्या काही क्लिप आमच्याकडे आहेत, त्या आम्ही माध्यमांपर्यंत पोहोचवू तसेच सोशल मीडिया वरून तुमची बदनामी करून तुमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू,` अशी धमकी देत या पाच जणांनी जानकर व दोडतले यांच्याकडून 50 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती .
यासंदर्भात अण्णासाहेब रुपनवर यांच्याकडे त्यांनी ही खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती तीस कोटी रुपये द्यावे असे निश्चित झाले होते, त्यातील 15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता आज बारामतीत द्यावा असे ठरले होते . हे पैसे स्विकारण्यासाठी आलेल्या सचिन पडळकर (रा.माळशिरस जि सोलापूर) डॉ. इंद्रकुमार भिसे (रा.शिरूर ), तात्या कारंडे (रा.माढा माळशिरस) विकास आलदार (रा. माढा) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, फौजदार सुनील बांदल, दत्तात्रय जगताप, सतीश अस्वर, यांच्यासह पोलीस कर्मचारी मोरेश्वर इनामदार , मुकुंद आयचीत, अनिल काळे, रविराज कोकरे ,रौफ इनामदार , गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत , तुषार सानप, नितीन जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बारामती मध्ये कृष्ण सागर हॉटेल येथे 4 मे रोजी या संदर्भात प्राथमिक बैठक झाली होती, त्यानंतर तडजोड झाल्यावर आज खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी हे पाच जण बारामतीत आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
What’s up tto every , because I aam truyly kesn off reading tthis blog’s ppst too be updated oon a reguloar basis.
It carris fastidious stuff.