पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन )
उंड्री परिसरातून एका नायजेरियन इसमाकडून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, उंड्री परिसरात एक नायजेरियन इसम कोकेनसारख्या अंमली पदार्थाची तरुण-तरुणींना विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना मिळाली.
डॉ. वेंकटेशम पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या निर्देशानुसार या संदर्भात अधिक माहिती प्राप्त करून रवींद्र शिसवे, पोलीस सह. आयुक्त अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिरीष सरदेशपांडे पो. उप. आयुक्त, गुन्हे अमीर शेख, सहा. पो. आयुक्त, गुन्हे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या अधिपत्याखाली दि. १७ जुलै रोजी उंड्री परिसरात सापळा रचून एका शोलाडॉये सॅम्युअल जॉय, वय ४४, रा. उंड्री, पुणे नावाच्या नायजेरियन इसमास पकडले. त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे खालीलप्रमाणे मुद्देमाल व रोख रक्कम सापडली. १) ८७,९६,०००/- रु. किमतीची ७३३ ग्रॅम कोकेन पावडर, २) ३,६८,०७०/- रोख रक्कम, ३) २४०००/- रु. किमतीचे पाच मोबाईल फोन, ४) ९०,०००/- रु. किमतीची तीन घड्याळे,५) डिजिटल वजनकाटा व कोकेन पावडर बांधण्यासाठी असलेल्या प्लास्टिक पिशव्या कि. रु. १०००/-असा एकूण ९१,७९,०७०/- रु. किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. त्याच्याकडे चौकशी करता तो पुणे शहर परिसरात, एनआयबीएम रोड, उंड्री येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कोकेनची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध चालू आहे.वरील कामगिरी पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या अधिपत्याखाली पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, मोकाशी,राहुल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांनी केली.
कोकेनची विक्री करणाऱ्या नायजेरियन आरोपीस अटक ; पुणे पोलिसांची कारवाई
Related tags :
Subscribe
Login
0 Comments