पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात पुण्याचे योगदान मोलाचे आहे. काळाच्या पुढे चालणाऱ्या कर्मवीर अण्णांनी पुण्यातून पाहिलेले रयत चे स्वप्न आता पूर्ण होत आहे, अजिंक्यतारा पुरस्कार हा कर्मवीरांचा व रयतच्या सोळा हजार सेवकांचा पुरस्कार आहे, अशा शब्दात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे येथील सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या ३० व्या वार्षिक स्नेह मेळाव्यात दिला जाणारा मानाचा ‘अजिंक्य तारा ‘ पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल अप्पासाहेब पाटील यांना आणि ” कृष्णा कोयना ” पुरस्कार पाणी पंचायतीच्या संचालिका व समाजसेविका श्रीमती कल्पना विलासराव साळुंखे यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र सह सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कल्पना साळुंखे म्हणाल्या,” कृष्णा कोयना पुरस्कार ,हा पाण्याचे नियोजन व समन्याय वाटप या विचाराचे कार्य करणाऱ्या पाणी पंचायत अभियानाचा पुरस्कार आहे.आपण सर्व निसर्गाच्या साखळीचा एक भाग आहे, जमीन, पाणी, वातावरण व संस्कार यात काही त्रुटी आहेत, विकासाची गती व निती यामध्ये भान ठेऊन समृध्दी पाहिजे.
” श्रीनिवास पाटील म्हणाले ,” सातारा जिल्हाने महाराष्ट्राला पाच मुख्यमंत्री, अनेक उद्योगपती व अनेक साही त्यिक दिलेनीलिमा श्रीरंग आहेत.”.
याप्रसंगी धर्मादाय आयुक्त नवनाथ जाधव, सहायक पोलिस निरीक्षक नीलिमा श्रीरंग जाधव आणि जागतिक कुस्ती संघटनेचे पंच नवनाथ ढमाळ यांचा तसेच, गुणवंत विद्यार्थी यांचा श्रीनिवास पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मान पत्र वाचन प्रा. जे. पी.देसाई व सुनिता वाघ यांनी केले.
याप्रसंगी, रयत चे सचिव डॉ.भाऊसाहेब कराळे, निवृत्त पोलिस महानिरीक्षक शशिकांत दैठणकर, संपतराव साबळे, हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, माजी कुलगुरू संत राम कदम, उद्योगपती रामदास माने, माजी आमदार महादेव बाबर, योगेश चव्हाण, डॉ.वसंतराव वाघ, सुनिता राजे पवार, उद्योगपती दशरथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक यशवंतराव उर्फ अण्णा साळुंखे यांनी केले. सूत्र संचालन संदीप साळुंखे यांनी केले. आभार भिमराव भोसले यांनी मानले.