पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र लिखित “ओबीसीचे कल्याण, निर्णयातून दिला सन्मान” या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ओबीसी भटके विमुक्त विभागाचे मंत्री संजय कुटे, सोलापूर जिल्ह्यचे पालकमंत्री विजय देशमुख ,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, खासदार शिदेश्वर महाराज, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास आण्णा रासकर, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख सुधाकर राजे, काका कोयते, माजी आमदार मनोहर पटवारी, प्रदिप भाले आदि मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या संकल्पनेतून उपलब्ध माहितीनुसार ओबीसी समाजातील संघटित माहिती एकत्र करून “ओबीसीचे कल्याण, निर्णयातून दिला सन्मान” ही माहिती पुस्तिका निर्माण करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ह्या पुस्तिकेतून काँग्रेसने ओबीसी जनतेवर कसा अन्याय केला? हे लक्षात येईल. भारतीय जनता पार्टीने 70 वर्षापासून प्रलंबित ओबीसी समाजाचे सामाजिक मूलभूत प्रश्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. ओबीसी समाजाचा इतिहास,वास्तव आणि सद्यस्थिती संक्षिप्त स्वरूपात या पुस्तकांमध्ये मांडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी समाजासह विविध समाज घटकाच्या कल्याणासाठी घेतलेल्या योग्य निर्णयाची आणि विविध योजनांची संक्षिप्त माहिती या पुस्तकांमध्ये समाविष्ट केली समाविष्ट केली आहे. काँग्रेस प्रणित केंद्र व राज्य सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला. संविधानिक हक्कापासून तब्बल चाळीस वर्ष वंचित ठेवले. ओबीसींना त्यांचे न्याय हक्क मिळू दिले नाहीत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी हिताचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले.एक इतिहास निर्माण केला. ऐतिहासिक अशा स्वरूपाचे निर्णयाची वस्तुनिष्ठ माहिती सर्वसामान्य नागरिकांना या पुस्तिकाद्वारे मिळणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विकास अण्णा रासकर रासकर यांनी दिली.
ओबीसीचे अभ्यासक प्रा.विनायक आंबेकर, मुक्त पत्रकार महेश टेळे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, प्रदेश सरचिटणीस संजय जाते, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख सुधाकर राजे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Thhis іs my firѕt tіme pay a quick visit at һere and i am actually ρleassant to reaԁ all at one place. https://Ncsurobotics.org/wiki/index.php/User:JoelAllen2