पुणे

बिग ब्रेकिंग….. पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन मारले ; मग आईची आत्महत्या : गंभीर घटनेने खळबळ

पिंपरी: (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
 पिंपरी-चिंचवड मध्ये आज अत्यंत धक्कादायक घटना घडली. पोटच्या तीन मुलांना (दोन मुली, एक मुलगा) गळफास देवून आईने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोसरीमध्ये घडली आहे. एकाच हुकला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीने लटकवल्यानंतर तिने दुसऱ्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

फातिमा अक्रम बागवान असं २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. हे कुटुंब मूळचं कर्नाटकचं आहे. हे कुटुंब चारच दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे येथून नूर मोहल्ला, न्यू प्रियदर्शनी शाळेशेजारी भोसरी येथे राहण्यास आले होते. भाडेतत्त्वावर हे कुटुंब राहत होते. अक्रम बागवान हा फळविक्रेता म्हणून यापूर्वी काम करीत होता. तो सध्या कामाच्या शोधात होता. फातिमा हिने अक्रमला काम शोधण्यासाठी बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर तिने १०.३० ते दुपारी ४च्या सुमारास मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय ९, इयत्ता ४थी), झोया अक्रम बागवान (वय ७, इयत्ता २री), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६, इयत्ता १ली) या तिघांनाही नायलॉन दोरीने गळफास लावला. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली. अक्रम हा दुपारी घरी आल्यावर त्याला दार आतून बंद असल्याचे आढळले. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने त्याने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने दार तोडण्यात आले असता घरात चौघांचे मृतदेह आढळून आले.

या महिलेने तीन मुलांना मारून स्वतः आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी तिने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती. पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली, मात्र त्यांना संशयास्पद काही सापडलेले नाही. बागवान कुटुंब मूळचे कर्नाटक येथील असल्याने त्यांचे नातेवाइक आल्यावर आणि पुण्यातील मित्र-मंडळी, नातेवाइक यांच्याकडे चौकशी केल्यानंतरच या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

Care este calendarul estimat pentru demararea construcției sălii de sport?
Visit us telkom university

3 months ago

Muchos Gracias for your article post.Really looking forward to read more. Keep writing. https://codehillacademy.com

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x